सोलापूर महानगरपालिकेत सध्या गटनेता, महापौर तसेच स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया पक्षाकडून सुरू आहे.यासंदर्भात कोणाशीही बोलू नका, माध्यमांसमोर व्यक्त होऊ नका, स्वीकृत नगरसेवकांच्या संदर्भात कोणालाही शब्द देऊ नका अशी तंबी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.मंत्री गोरे यांनी शनिवारी झालेल्या नूतन नगरसेवकांच्या बैठकीत पक्ष पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांना मार्गदर्शन सूचना केल्या.पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात नूतन नगरसेवकांची नोंदणी करण्यासाठी बुधवार 28 जानेवारी रोजी हजर राहण्याची सूचना पालकमंत्री गोरे यांनी या बैठकीत केली.सकाळी साडेदहा वाजता सर्वांची उपस्थिती बंधनकारक असून सर्वांच्या सह्या लागणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

