आज HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत असून, जुन्या नंबर प्लेटसह रस्त्यावर धावणाऱ्या वाहनधारकांसाठी मोठा इशारा जारी करण्यात आला आहे. आज रात्रीनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत दंड, तसेच वाहन जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे.तुमच्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनावर अजूनही जुनी नंबर प्लेट असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्यासाठी सरकारने दिलेली मुदत आज संपत असून, त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) विशेष तपासणी मोहीम राबवू शकतात. अशा वेळी जुन्या नंबर प्लेटसह वाहन आढळल्यास 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत दंड, तसेच आवश्यकतेनुसार वाहन जप्तीची कारवाई होऊ शकते.











