सोलापूर – क्रीडा व युवक संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोंडी आणि विजयसिंह मोहिते-पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कोंडी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
१. सॉफ्ट टेनिस स्पर्धा (हरीभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथे पार पडल्या) – ७ विद्यार्थी निवड:
- १४ वर्षे मुली: कु. समृद्धी धर्मराज नन्नवरे – जिल्ह्यात द्वितीय
- १७ वर्षे मुली: कु. दर्शना अतुल देशमुख – जिल्ह्यात प्रथम
- १९ वर्षे मुली: कु. श्रद्धा धर्मराज नन्नवरे – द्वितीय, कु. अक्षरा दिनकर साठे – तृतीय
- १९ वर्षे मुले: आदर्श ज्योतिबा गुंड – प्रथम, युद्धाजीत दत्तात्रय भोसले – द्वितीय, अथर्व रोहित चौगुले – चौथा
२. ॲथलेटिक्स स्पर्धा (पंढरपूर येथे पार पडल्या) –
- अथर्व संतोष गायकवाड – १०० मी. प्रथम, २०० मी. द्वितीय
- आकांक्षा अनिल शिंदे – गोळाफेक द्वितीय (विभागीयसाठी निवड)
- कार्तिक नागनाथ दळवे – भालाफेक प्रथम (विभागीयसाठी निवड)
३. तलवारबाजी स्पर्धा –
- कु. सफा एजाज शेख (१७ वर्षे) – ईपी प्रकारात प्रथम
- कु. शगुन शिवाप्पा राठोड (१९ वर्षे) – फॉईल प्रकारात द्वितीय
एकूण १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक दिलीप भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ, प्राचार्य सुषमा नीळ, मुख्याध्यापिका अर्चना औरादे व प्रतिक्षा खुणे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.








