सोलापूर : शनिवार पेठ येथील अन्नपूर्णा संकुल येथील दीपक सुरवसे यांच्या घरातील २८ हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल हँडसेट अज्ञात चोरट्याने १४ ऑगस्ट रोजी सकाळी सहा ते नऊ या वेळेत चोरून नेल्याची फिर्याद जेलरोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे . पोलीस नाईक पठाण अधिक तपास करीत आहेत.
*
मारुती चौकात खिशातून मोबाईल पळविला…
नामदेव भडंगे हे मारुती चौक भागात केळीचे खुंट खरेदी करण्यासाठी थांबले असताना अज्ञात चोरट्याने शर्टाच्या खिशातून मोबाईल चोरून नेला आहे. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सातपुते अधिक तपास करीत आहेत.
*
घरातून लॅपटॉप व चार्जरची चोरी…
होटगी रस्ता येथील रामलाल नगर येथे राहणाऱ्या पिनाक डांगे हा तरुण दुसऱ्या मजल्यावरून रुममध्ये आंघोळीसाठी गेला असता अज्ञात चोरट्याने लॅपटॉप व चार्जर चोरून नेल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस नाईक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
*
जुन्या भांडणामुळे शिवीगाळ करून दमदाटी…
अक्कलकोट रोड येथील समाधान नगर येथे राहणाऱ्या लजा राजू बंडा यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ केल्याचे तसेच दमदाटी करून मारहाण केल्याची फिर्याद महादेव बिराजदार, सुरेखा पाटील, मेहबूब बागवान आदी व्यक्तींविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी पोलीस सब इन्स्पेक्टर माळी अधिक तपास करीत आहेत.