सोलापूर : सोलापूर शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर प्रीती प्रकाश टीपरे यांना स्वातंत्र्यदिनी विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे मोटार परिवहन विभागातील पोलीस निरीक्षक सुरजीत सिंह रजपूत , जेलरोडचे सहाय्यक फौजदार सैपन जमादार, सहपोलीस आयुक्त विभागातील पोलीस नाईक बालाजी पोतदार आणि गुन्हे शाखेतील पोलीस नाईक संदीप जावळे व विजयकुमार वाळके यांना पोलीस महासंचालक यांनी जाहीर केलेले सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
पोलीस विभागातील कोरोना योद्धा म्हणून पोलीस कल्याण विभागाचे पोलीस हवालदार ए.जे.तारानाईक यांचादेखील पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त डॉक्टर दिपाली घाटे ,पोलीस उपायुक्त बापू बांगर आणि पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर उपस्थित होते.