उपनगर पोलिसांची मोठी कारवाई
नाशिकमध्ये उपनगर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत तीन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे १ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शोध पथकाचे शिपाई सूरज गवळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली जेलरोड परिसरातील जुना सायखेडा रोड, दुर्गामाता मंदिराजवळ सौरभ महाले आणि कौस्तुभ इखणकर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्या जवळून ५ ग्रॅम एमडी, दोन मोबाईल फोन आणि दुचाकी जप्त करण्यात आली.
यापुढील तपासात पोलिसांनी इर्शाद चौधरी याला अटक करून त्याच्याकडून पुन्हा ५ ग्रॅम एमडी आणि दोन गावठी बंदुका हस्तगत केल्या. एकूण १ लाख ७४ हजार १०० रुपयांचा ऐवज या कारवाईत जप्त झाला आहे.

