दहावीतील तब्बल तीनशे गुणवंताचा झाला सत्कार

0
17

येस न्यूज मराठी, चाटे कोचिंग क्लासेस आणि भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या वतीने सोलापुरात बुधवारी छत्रपती रंगभवन सभागृहात दहावी परीक्षेतील तब्बल 300 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार, भास्कराचार्य प्रतिष्ठान ची सर्जेराव राऊत, चाटे शिक्षण समूहाचे बिजनेस अँड डेव्हलपमेंट ऑफिसर श्रीधर मारणे, चाटे शिक्षण समूह सोलापूरचे हेड सतीश काळे येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे आधी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला ऐश्वर्या हिबारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सतीश काळे यांनी आभार मानले.