मुंबई : शिवसेनेचे अकोला जिल्ह्यातील आमदार नितीन देशमुख यांनी सुटका करुन पळून आल्याचा दावा खोटा असल्याचं बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात आला आहे. त्यासंबंधी देशमुख यांचा एक फोटो शेअर करण्यात आला असून देशमुख यांना स्पेशल चार्टर विमानाने नागपूरला पोहोचवण्यात आल्याचं या गटाकडून स्पष्ट करण्यात आलं.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील पॉलिटिकल ड्रामा काही संपायचं नाव घेत नाही. त्यात आता रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे गटावर आणि भाजपवर काही आरोप केले होते. गुजरात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन जबरदस्तीने इंजेक्शन टोचलं. माझा घात करण्याचा प्रयत्न होता असा आरोप त्यांनी राज्यात परत आल्यावर केला होता.