शिवसेनेची गळती काही थांबेना… एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांची संख्या झाली ४६

0
8

येस न्युज नेटवर्क : शिवसेनेच्या आमदारांचे बंड वणव्यासारखे पसरले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या 46 वर पोहचली आहे. रामटेकचे शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांच्यासह चार आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. आज आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार आज शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. एकनाथ शिंदे आज मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

बुधवारी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरांना प्रत्यक्षात चर्चा करण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातली. त्यानंतरही शिवसेनेतील आमदारांची गळती कमी होताना दिसत नाही. आज एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झालेले आमदार हे मागील दोन दिवस शिवसेनेच्या बैठकीत सहभागी होते. त्यानंतर आज हे आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले. आमदार सदा सरवणकर यांच्यासोबत त्यांची कन्यादेखील गुवाहाटीत दाखल झाली आहे. आज दाखल झालेल्या शिवसेना आमदारांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.