• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
August 19, 2026
in इतर घडामोडी
0
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
0
SHARES
10
VIEWS

सोलापूर : पदमशाली समाजाचे कुलदैवत श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांच्या नारळी पौर्णिमा उत्सवाला श्री मार्कंडेय मंदिरात भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. नारळी पौर्णिमेनिमित्त पदमशाली समाजाच्या वतीने गेल्या १०० वर्षांपासून श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सव व मिरवणूक काढण्याची परंपरा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर श्री मार्कंडेय मंदिरात श्रींच्या उत्सव मूर्तीची पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली.

उत्सवाच्या प्रारंभी महापौर विनायक कोंड्याल व त्यांच्या पत्नी धनश्री कोंड्याल यांच्या शुभहस्ते श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांचा विधिवत रुद्राभिषेक करण्यात आला. यानंतर श्रींच्या उत्सव मूर्तीच्या पालखीचे पूजन महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले. धार्मिक विधी पार पडल्यानंतर पालखीची मंदिर परिसरातून प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘जय मार्कंडेय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला.

नारळी पौर्णिमा उत्सवाला पदमशाली समाजामध्ये विशेष महत्त्व असून, श्री महर्षी मार्कंडेय महामुनी हे समाजाचे आराध्यदैवत मानले जाते. शतकभरापासून सुरू असलेली ही परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. पालखी प्रदक्षिणेच्या वेळी मोठ्या संख्येने समाजबांधव व भाविक उपस्थित होते.

याप्रसंगी पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, उपाध्यक्ष महांकाली येलदी, उद्योजक मुरलीधर आरकाल, गणेश बुधाराम, पदमशाली युवक संघटनेचे अध्यक्ष ॲड. हेमंतकुमार साका, नगरसेवक विजय चिप्पा, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक शेखर इगे, तुषार जक्का यांच्यासह पदमशाली समाजातील मान्यवर, महिला, युवक व मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

दरम्यान, महापौर विनायक कोंड्याल आणि पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी नारळी पौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली असल्याचे सांगितले. उत्सवानिमित्त पुढील सात दिवस श्री मार्कंडेय मंदिरात तेलुगू भाषेत ‘वचन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमात समाजबांधव व भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री महर्षी मार्कंडेय महामुनींचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

दि. २८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांचा भव्य रथोत्सव व मिरवणूक काढण्यात येणार असून, या रथोत्सवात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पदमशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

Next Post

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026