• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस चा तुटवडा भासणार नाही- प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम

Yes News Marathi by Yes News Marathi
March 11, 2026
in मुख्य बातमी
0
जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस चा तुटवडा भासणार नाही- प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम
0
SHARES
2
VIEWS

नागरिकांनी इंधन व गॅस सिलेंडरची अतिरिक्त साठवणूक न करण्याचे आवाहन

नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे

सोलापूर – जिल्हा प्रशासनाची बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल या इंधन व गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीशी चर्चा झालेली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरचा कुठेही तुटवडा भासणार नाही. या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरची अतिरिक्त साठवणूक करू नये. तसेच कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे.

प्रभारी जिल्हाधिकारी जंगम पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात मागणी प्रमाणे गॅसचा पुरवठा होणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवू नये. गॅस पुरवठा कंपन्या व त्यांच्या एजन्सी यांच्याशी जिल्हा प्रशासन सातत्याने संपर्कात असून मागणीप्रमाणे गॅस पुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जिल्ह्यातील गॅस कंपनीचे समन्वय अधिकारी यांची तातडीची बैठक घेऊन गॅस सिलेंडर वाटप नियोजनाचा आढावा घेतलेला आहे. जिल्ह्यात एकूण 94 गॅस एजन्सी कार्यरत आहेत. यामध्ये बीपीसीएल 54, एचपीसीएल 20 व आयओसीएल 20 अशा गॅस एजन्सी आहेत. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर या गॅस एजन्सी मार्फत गॅस सिलेंडर वितरण नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती संबंधित गॅस कंपनी समन्वय अधिकारी यांनी दिली.

हे बदल खालील प्रमाणे…
१. गॅस एजन्सीमार्फत व्यावसायिक तत्त्वावर पुरविण्यात येणाऱ्या सर्व गॅस सिलेंडरचे बुकींग पुर्णतः बंद केलेले आहे. २. शासकीय संस्था, रुग्णालय, एनटीपीसी, अन्नछत्र मंडळ यांना वरील नियमामधून सूट देण्यात आलेली आहे. ३. व्यावसायिक तत्त्वावर पुरविण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडर बाबत उच्चस्तरीय चर्चा करणेत येत असून सर्व बार्बीचा विचार करून यावर निर्णय घेणेत येईल. ४. घरगुती गॅस सिलेंडर बुक केलेनंतरचा प्रतिक्षा कालावधी २५ दिवसांचा करणेत आलेला आहे. ५. घरगुती गॅस सिलेंडर वितरीत करताना कंपनीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या OTP ची खातरजमा करणेत येत आहे. गॅस सिलेंडरचा दुरुपयोग होवू नये याकरीता OTP पडताळणी अनिवार्य करणेत आलेली आहे. तसेच EKYC ही करणेत येईल.


जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत गॅस सिलेंडर वितरण नियंत्रित करणे करीता तसेच काळाबाजार रोखणे याकरीता तालुका स्तरीय दक्षता पथक गठीत करणेत आलेले आहे. सदर दक्षता पथकांना गॅस एजन्सीच्या तपासण्या करून दैनंदिन गॅस सिलेंडर आवक जावक वर नियंत्रण ठेवणेबाबत निर्देशित करणेत आलेले आहे. सोलापूर जिल्हयाची घरगुती गॅस ग्राहकांची माहे फेब्रुवारी २०२६ अखेर एकुण संख्या ११,८८,२५८ इतकी आहे. सोलापूर जिल्हयाची व्यावसायिक गॅस ग्राहकांची माहे फेब्रुवारी २०२६ अखेर एकुण संख्या १०,८०० इतकी आहे. सोलापूर जिल्हयाकरीता घरगुती गॅस ची दैनंदिन गरज २५० मे.टन इतकी असून व्यावसायिक गॅस ची १० मे.टन इतकी आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे व अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली आहे.

Previous Post

जी. डी. सी. अँड ए व सी. एच. एम. परीक्षा 2026 साठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

Next Post

भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026