• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 11, 2026
in इतर घडामोडी
0
भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – बालाजी अमाईन्स लि.रोटरी क्लब ऑफ सोलापूर, आणि शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन, चिंचोळी MIDC येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ४५७ लाभार्थींनी तपासणी करून घेतली. त्यामध्ये १३६ जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असून १९० जणांना चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिराचा उद्देश नागरिकांना नेत्र आरोग्याबाबत जागरूक करणे तसेच गरजू रुग्णांना मोफत नेत्र तपासणी व आवश्यकतेनुसार चष्मा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देणे असा होता.

बालाजी अमाईन्स तर्फे CSR फंडातून यासाठी मदतनिधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा रोटे. धनश्री केळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि रोटरी क्लबच्या कार्याची माहिती दिली. प्रकल्प प्रमुख रोटे. मितेश पंचमिया यांनी प्रास्ताविकातून शिबिराचा उद्देश सांगितला. तसेच या शिबिरानंतर तामलवाडी भागात आणि ST कर्मचाऱ्यांसाठी देखील असेच नेत्र तपासणी शिबीर आयोजीत करण्यात येत असल्याची माहिती दिली.

यानंतर बालाजी अमाईन्स लि. चे CSR चे अनिल विपत यांनी कंपनीच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देत या प्रकल्पाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. सुधीर सुधाळ यांनी नेत्र आरोग्याचे महत्त्व आणि H. V. देसाई नेत्र रुग्णालय तसेच शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाची माहिती दिली. कार्यक्रमास सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे गणेश सुत्रावे यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असलेले रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे नियुक्त प्रांतपाल DGE जयेशभाई पटेल यांनी आपल्या मनोगतातून समाजहितासाठी रोटरी क्लबकडून राबविण्यात येणाऱ्या सेवा प्रकल्पांची माहिती दिली. तसेच येत्या काळात रोटरी डिस्ट्रिक्ट कडून जे मेगा प्रोजेक्ट घेण्यात येणार आहेत त्याविषयी संवाद साधला. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालाजी अमाईन्स लि. चे पूर्णवेळ संचालक राजेश्वर रेड्डी यांनी आपल्या मनोगतातून सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अशा उपक्रमांना कंपनीचा कायम पाठिंबा राहील आणि अनेक सेवाभावी संस्था एकत्र येऊन असे मोठे प्रकल्प नक्कीच यशस्वी करू शकतात असे सांगितले. 
कार्यक्रमाचा समारोप बालाजी अमाईन्स लि. चे CSR प्रतिनिधी दत्तप्रसाद सांजेकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन सुतार यांनी केले. या शिबिराच्या माध्यमातून मोठ्या संख्येने नागरिकांना नेत्र तपासणी व आवश्यक उपचारांची सुविधा उपलब्ध होणार असून समाजातील गरजू घटकांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.या शिबिराच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे सदस्य व बालाजी अमाईन्स लि चे अधिकारी निलेश फोफलिया, आशिष मेहता,पारूल पटेल, सुनील माहेश्वरी, शिवाजी उपरे, संजय मडूर, सचिन मोरे ,अमोल गुंड , बसवराज अंटद, गजानन काळे,गणेश नवगिरे,आदित्य जैन ,अमोग पांडे,संतोष कणेकर, डॉ. राजीव मोहोळकर, मकरंद बसवंती, विशाल वर्मा, बी. एस. मुंदडा यांनी विशेष सहकार्य केले.

Previous Post

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस चा तुटवडा भासणार नाही- प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम

Next Post

आ. कोठेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे आयटी पार्क..नाईट लँडिंगबाबत हे उत्तर…!

Related Posts

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर
इतर घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026
Next Post
आ. कोठेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे आयटी पार्क..नाईट लँडिंगबाबत हे उत्तर…!

आ. कोठेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे आयटी पार्क..नाईट लँडिंगबाबत हे उत्तर…!

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026