• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्याला मिळणार दोन नव्या वंदे भारत ट्रेन.. मुंबईहून सोलापूर आणि शिर्डीसाठी आलीशान गाड्या

Yes News Marathi by Yes News Marathi
February 1, 2023
in मुख्य बातमी
0
राज्याला मिळणार दोन नव्या वंदे भारत ट्रेन.. मुंबईहून सोलापूर आणि शिर्डीसाठी आलीशान गाड्या
0
SHARES
1
VIEWS

सोलापूरचं तिकीट रु. 2200 फक्त तर शिर्डीसाठी रु.1800
शुक्रवार, 10 फेब्रुवारीपासून राज्यात मुंबई- सोलापूर आणि मुंबई – साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकासकामाचं उद्घाटन करणार आहेत. त्याशिवाय वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदीलही दाखवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते साईनगर शिर्डी अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. 10 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी या दोन्ही गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता हा सोहळा सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील या सोहळ्यासा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात सुरु होणाऱ्या या वंदे भारत एक्स्प्रेस ही 9 वी आणि 10 वी गाडी असणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या या उद्घाटन समारंभाला राज्यातील काही निवडक विद्यार्थ्यांना रेल्वेतर्फे निमंत्रण देखील देण्यात येणार आहे. रेल्वेच्या संदर्भातील विषयांवर केंद्रीय विद्यालय तसेच राज्यातील शाळांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या विद्यार्थ्यांना वंदे भारत एक्सप्रेस चा प्रवास करता येणार आहे. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी जाणाऱ्या या गाड्यांचा ज्या ज्या स्थानकावर थांबा असेल तिथे स्वागताची तयारी देखील सुरु आहे. उद्घाटन झाल्यानंतर लगेच नियमित सेवा सुरु होणार आहे का? या बाबत अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
वंदे भारत एक्सप्रेस नियमित सुरु झाल्यानंतर सोलापुरातून ही रेल्वे सकाळी सहा वाजता निघणार आहे. मुंबईत पोहोचायला जवळपास साडेसहा तास या गाडीला लागणार असून दुपारी 12.30 च्या सुमारास तिथे पोहोचेल. तसेच मुंबईतून दुपारी 4.30 च्या सुमारास ही गाडी सोलापूरच्या दिशेने रवाना होईल. सोलापुरात रात्री 10.40 वाजता ही गाडी पोहोचेल. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र वेळे संदर्भात अद्याप कोणाताही अधिकृत माहिती रेल्वेकडून जारी करण्यात आलेली नाही.
सोलापूर ते मुंबई हे अंतर रेल्वेने 455 किमी इतके आहे. एक्सप्रेस गाडीला या प्रवासासाठी साधारण साडे आठ तास लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेस साडे सहा तासात हा प्रवास पूर्ण करण्याची शक्यता आहे. सोलापूर, कुर्डूवाडी, पुणे, लोणावळा,ठाणे, दादर, हे थांबे या गाडीला असणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर चेअर कार साठी 900-1100 रुपये आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1900-2200 रुपये इतके शुल्क असण्याची शक्यता आहे. या शुल्कात प्रवाशांना आरामदायी प्रवाशासह नाश्ता, पाणी बॉटल देखील मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी सकाळी 6.15 वाजता शिर्डीच्या दिशेने निघेल आणि दुपारी 12.10 वाजता शिर्डीत पोहोचेल. तर साईनगर शिर्डीवरुन वंदे भारत एक्सप्रेस संध्याकाळी 5.25 च्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना होईल. तर रात्री 11.18 वाजता ही गाडी मुंबईत दाखल होईल. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र अद्यात वेळे संदर्भात कोणाताही अधिकृत अध्यादेश रेल्वेतर्फे निघालेला नाही.
साईनगर शिर्डी ते मुंबई हे अंतर 385 किमी इतके आहे. एक्सप्रेस गाडीला हा प्रवास करण्यासाठी साधारण 6 तास लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेस साडे पाच तासात हे अंतर पूर्ण करेल. साईनगर शिर्डी, नाशिक, ठाणे, दादर, मुंबई हे या गाडीचे थांबे असण्याची शक्यता आहे. चेअर कारसाठी 800 ते 1000 आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1600 ते 1800 रुपये दर असण्याची शक्यता आहे. मात्र स्थानिक रेल्वे प्रशासनाला अधिकृत कोणतीही माहिती या संदर्भात केंद्रीय रेल्वे विभागाकडून आलेली नाही.

Previous Post

आज माघी एकादशीचा सोहळा; पंढरपूरमध्ये लाखो भाविकांनी केली गर्दी

Next Post

सोलापूर विद्यापीठ व बोर्ड परीक्षेचे कामकाज आजपासून ठप्प होणार

Related Posts

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!
मुख्य बातमी

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्य बातमी

सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 26, 2026
265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
मुख्य बातमी

265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

September 26, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!
मुख्य बातमी

गणेश विसर्जन मिरवणुकीतील दोन चांगल्या आणि दोन चिंताजनक बाबी…!

September 26, 2026
75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर
मुख्य बातमी

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

September 26, 2026
सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…
मुख्य बातमी

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठ व बोर्ड परीक्षेचे कामकाज आजपासून ठप्प होणार

सोलापूर विद्यापीठ व बोर्ड परीक्षेचे कामकाज आजपासून ठप्प होणार

ताज्या बातम्या

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026