येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापूर विभागातील भाळवणी-भिगवण सिंगल लाइन सेक्शनमध्ये दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी प्रशासनाने इंजिनियरिंग ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे सोलापूर ते पुणे व पुणे ते सोलापूर ही रेल्वे १२, १५, १९, २२, २६, २९ व ३१ मार्च रोजी धावणार नाही. पनवेल-नांदेड रेल्वे विशेष एक्सप्रेस ही गाडी १५ मार्च व १ एप्रिल, नांदेड-पनवेल ही गाडी १४, ३१ मार्च रोजी धावणार नाही. याशिवाय विशखापट्टनम-लोकमान्य टिळक टर्मिनल विशेष एक्सप्रेस ही १२, ३० मार्च रोजी धावणार नाही. लोकमान्य टिळक टर्मिनल- विशखापट्टनम विशेष एक्सप्रेस ही गाउी १४ मार्च व १ एप्रिल रोजी धावणार नाही. तरी सर्व प्रवाशांनी रद्द झालेल्या व मार्गात बदल झालेल्या गाड्यांची माहिती घेऊनच प्रवास करावा असे आवाहन वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी केले आहे.
मार्गात बदल केलेल्या गाड्या….
- मुंबई-नागरकॉईल विशेष एक्सप्रेस ही एक्सप्रेस १३, १६, १७, १८, २०, २३, २५, २७, ३० व ३१ मार्च रोजी ठाणे, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, मंगलुरू जंक्शन, शोरणूर, ईरोड, करूर मार्गाने धावणार आहे.
- नागरकॉईल- मुंबई विशेष एक्सप्रेस ही गाडी १२, १५, १६, १७, १९, २२, २३, २४, २६, २९, ३० व ३१ मार्च राेजी करूर, ईरोड, शोरणूर, मंगलुरू जंक्शन, मडगाव, रत्नागिरी, पनवेल, ठाणे, मार्गाने धावणार आहे.
- मुंबई-नागरकॉईल विशेष एक्सप्रेस ही गाडी १२, १५, १९, २२, २६, २९ मार्च रोजी ठाणे, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, मंगलुरू जंक्शन, शोरणूर, ईरोड, तिरूच्चिराप्पाल्लि मार्गाने धावणार आहे.
- नागरकॉईल- मुंबई विशेष एक्सप्रेस ही गाडी १४, १८, २१, २५, २८ मार्च रोजी तिरूच्चिराप्पाल्लि, ईरोड, शोरणूर, मंगलुरू जंक्शन, मडगाव, रत्नागिरी, पनवेल, ठाणे, मार्गाने धावणार आहे.