• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
October 22, 2026
in Blog
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलातील मानसशास्त्र विभाग आणि माइंड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य: शांततापूर्ण जीवनाचा मार्ग या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे आणि मानसशास्त्र विभागाचे प्रभारी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. विष्णू खडाखडे आणि पाहुण्यांची ओळख डॉ. हजीमलंग शेख यांनी करुन दिली.

पहिल्या सत्रात प्रमुख वक्त्या डॉ. स्वाती कोरके म्हणाल्या, आपण थोडासा शारीरिक त्रास झाला तरी लगेच डॉक्टरांकडे धाव घेतो, परंतु मन जेव्हा थकते, उद्विग्न होते किंवा सतत नकारात्मक विचारांच्या गर्तेत अडकते, तेव्हा आपण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. हीच दुर्लक्षाची प्रवृत्ती पुढे गंभीर मानसिक आजारांना निमंत्रण देते. मानसिक आरोग्य जपण्यासाठी सकारात्मक विचारसरणी, कामाच्या व्यापातून मिळवलेली नियमित विश्रांती, आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या भावनांचे योग्य व्यवस्थापन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

दुसर्‍या सत्रात डॉ. अनिल गोडबोले यांनी समुपदेशन आणि मानसिक आरोग्यात तरुणांची भूमिका या विषयावर अत्यंत सखोल आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. गोडबोले म्हणाले की, आजचा तरुण वर्ग हा एका मोठ्या संक्रमणावस्थेतून जात आहे. करिअरची चिंता, अभ्यासाचे वाढते ओझे, नातेसंबंधांतील गुंतागुंत, सोशल मीडियावरील आभासी जग आणि कौटुंबिक अपेक्षांच्या ओझ्याखाली युवा पिढी अनेकदा मानसिक दबावाखाली येते. अशा वेळी हा दबाव आतल्या आत साठवून ठेवण्याऐवजी, योग्य वेळी तज्ज्ञांचे समुपदेशन घेणे अत्यंत फायदेशीर ठरते. समुपदेशन घेणे हा कमकुवतपणा नसून ती स्वतःला सावरण्याची आणि प्रगल्भ होण्याची एक धाडसी कृती आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे पटवून दिले. तरुणांनी केवळ स्वतःच्याच मानसिक आरोग्याची काळजी घेऊ नये, तर आपल्या मित्रपरिवारात, कुटुंबात किंवा समाजात कोणी मानसिक संघर्षातून जात असेल, तर त्यांनाही मदतीचा हात दिला पाहिजे. युवक हे समाजात मानसिक आरोग्याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी सर्वात मोठे आणि प्रभावी माध्यम ठरू शकतात.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गौतम कांबळे म्हणाले, विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व, समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे मानसिक संतुलन सुदृढ असणे तितकेच महत्त्वाचे आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नेतृत्व आहेत. जर त्यांचे मनच शांत आणि स्थिर नसेल, तर ते उत्तम समाज कसा घडवतील? त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच त्यांच्या मानसिक आरोग्यासाठीही नेहमीच कटिबद्ध राहील. भविष्यातही उपयोजित मानसशास्त्र विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारची शिबिरे आणि समुपदेशन केंद्रे अधिक सक्षमपणे राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. प्रभाकर कोळेकर म्हणाले, आजच्या पिढीला केवळ शैक्षणिक ज्ञानाचीच नव्हे, तर भावनिक बुद्धिमत्तेची आणि मानसिक स्थैर्याची नितांत गरज आहे. उपयोजित मानसशास्त्र विभागाचा हा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की, पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करावे. आजचे हे चर्चासत्र त्याच दिशेने टाकलेले एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर आभार स्वप्नील सोनवणे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला संकुलातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Previous Post

पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

Next Post

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये ‘स्वच्छ, सुंदर व निरोगी’ अभियान उत्साहात
Blog

सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये ‘स्वच्छ, सुंदर व निरोगी’ अभियान उत्साहात

October 22, 2026
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज
Blog

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज

October 22, 2026
ए. जी. पाटिल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे “कायदेविषयक जनजागृती”
Blog

ए. जी. पाटिल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे “कायदेविषयक जनजागृती”

October 22, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक
Blog

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

October 21, 2026
रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा
Blog

रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा

October 21, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
Blog

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

October 20, 2026
Next Post
शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

October 22, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

October 22, 2026
पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

October 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026