• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी

Yes News Marathi by Yes News Marathi
September 28, 2026
in Blog
0
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी
0
SHARES
2
VIEWS

कोल्हापूर – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने घेतलेल्या काही निर्णयांबाबत तसेच प्रशासकीय प्रक्रियांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर तातडीने सूचीबद्ध करण्यासाठी ॲड. असीम सुहास सरोदे यांनी बाजू मांडली.

न्या. शर्मिला देशमुख आणि न्या. नीरज धोटे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, या प्रकरणात जीवन जगण्याचा व स्वातंत्र्याशी संबंधित तातडीचा मुद्दा नाही. तसेच न्यायालयाच्या व्यस्ततेचा विचार करून हे प्रकरण २२ ऑक्टोबर २०२६ रोजी घेण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले.

या याचिकेत निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी निवडणूक आयोगाच्या किमान १४ निर्णयांबाबत व प्रशासकीय प्रक्रियांबाबत आक्षेप नोंदविल्याचा आणि ते आक्षेप योग्य पद्धतीने विचारात घेतले गेले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, दोन्ही निवडणूक आयुक्तांनी मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे व पुनर्स्थापित करणे, मतदार यादीशी संबंधित माहिती, निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांचे कामकाज तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सॉफ्टवेअर याबाबत विविध प्रसंगी आक्षेप नोंदविले होते.

या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त अधिनियम, २०२३ मधील कलम १८ अन्वये निवडणूक आयोगाने आपली कार्यवाही सामूहिक पद्धतीने आणि कायद्यानुसार केली का, हा कायदेशीर प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.

याचिकेत जुलै २०२६ मध्ये करण्यात आलेल्या Form-6 मधील बदलांनाही आव्हान देण्यात आले आहे. तसेच ECINet प्रणालीच्या कार्यपद्धतीबाबत निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

याचिकेत मागण्यात आलेल्या प्रमुख मागण्या

याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे, अन्य मागण्यांसह, पुढीलप्रमाणे दिलासा मागितला आहे—

  • कथितपणे एकतर्फी पद्धतीने घेतलेले १४ प्रशासकीय निर्णय/आदेश रद्द करावेत;
  • महाराष्ट्रातील Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेला स्थगिती द्यावी;
  • SIR प्रक्रियेदरम्यान कथितरीत्या वगळण्यात आलेली मतदारांची नावे पुनर्स्थापित करावीत;
  • संबंधित राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुका नव्याने मतदार याद्या तयार करून त्या कायद्यानुसार मंजूर होईपर्यंत पुढे ढकलण्याबाबत योग्य आदेश द्यावेत; आणि
  • SIR प्रक्रियेशी संबंधित कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र न्यायिक समिती स्थापन करावी.

याचिकेत T.N. Seshan v. Union of India आणि S.S. Dhanoa v. Union of India या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचाही आधार घेण्यात आला असून, बहुसदस्यीय निवडणूक आयोगाच्या सामूहिक कार्यपद्धतीच्या महत्त्वाबाबत युक्तिवाद करण्यात आला आहे.

याचिकाकर्त्यांचा पुढील दावा असा आहे की, मुख्य निवडणूक आयुक्तांकडून कथितरीत्या करण्यात आलेल्या काही कृती या निवडणूक आयोगाच्या कामकाजास लागू असलेल्या वैधानिक व घटनात्मक आवश्यकतांच्या विरोधात आहेत. त्यामुळे अशा कथित कृतींबाबत उपलब्ध असलेल्या कायदेशीर संरक्षणाच्या कक्षेबाबतही याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

याचिकेत भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार; निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू व विवेक जोशी; तसेच राज्य निवडणूक आयोग यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

ही याचिका प्रथमेश गोपाल गावकर, गौरव सूर्यकांत नाखरेकर, आदेश शशिकांत भाटकर आणि स्मिताली निलेश नार्वेकर यांनी दाखल केली असून, त्यांना ॲड. असीम सुहास सरोदे यांची कायदेशीर मदत आहे.

याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले , ॲड. सकलेन मुजावर, ॲड. प्रबुद्ध बोरगावकर, ॲड. सुदर्शन केळगणे, ॲड. राजवर्धन निकम, ॲड. तिश्हार सोनुळे, ॲड. आर्या राजेभोसले, ॲड. तृप्ती गायकवाड, ॲड. प्रेरणा बनसोडे, ॲड. ऋषिकेश पालवडे आणि ॲड. सचिन बनाईत काम पाहत आहेत.या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.

Previous Post

दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख

Next Post

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या प्रेसिडेंट पदी सत्यनारायण बोल्ली यांची निवड

Related Posts

दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख
Blog

दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख

September 28, 2026
सोलापूर मुंबई विमानसेवेला कायमचा ब्रेक?
Blog

सोलापूर मुंबई विमानसेवेला कायमचा ब्रेक?

September 28, 2026
युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!
Blog

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!

September 27, 2026
उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर
Blog

उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

September 27, 2026
श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
Blog

श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

September 26, 2026
100 व्या साहित्य संमेलनात कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने सहभागी व्हावे – योगेश सोमण
Blog

100 व्या साहित्य संमेलनात कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने सहभागी व्हावे – योगेश सोमण

September 26, 2026
Next Post
श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या प्रेसिडेंट पदी सत्यनारायण बोल्ली यांची निवड

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या प्रेसिडेंट पदी सत्यनारायण बोल्ली यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

September 28, 2026
गणेशोत्सवानिमित्त सोलापुरात मोफत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

गणेशोत्सवानिमित्त सोलापुरात मोफत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

September 28, 2026
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला सुनावणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला सुनावणी

September 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026