सोलापूर : शहरातील सात रस्ता परिसरात असलेल्या महापालिकेच्या बस डेपोमध्ये आग लागल्याची घटना घडली. या आगीत महापालिकेच्या जुन्या बसगाड्यांनी पेट घेतल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.
बस डेपोमध्ये आग लागल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. आगीमुळे किती बसगाड्यांचे नुकसान झाले, तसेच आगीचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.













