येस न्युज नेटवर्क । देशात करोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात करोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे. मात्र, मृत्यू्चे प्रमाण अद्याप चिंतेचा विषय आहे. भारतात, गेल्या २४ तासात करोना संक्रमणामुळे ४३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात मृत्यू झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. गेल्या २४ तासात करोनाचे २,६३,५३३ नवीन रुग्ण आढळले आहेत.
भारतात आतापर्यंत २,५२,२८,९९६ करोना केसेस आढळले आहेत. तर २,१५,९६,५१२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे. २,७८,७१९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या भारतात ३३,५३,७६५ बाधित करोना रुग्ण आहेत.