राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी शिवसेना कोणाची याचा फैसला आज होणार

0
23

शिवसेना कोणाची याचा फैसला आज होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं यावर निर्णय देणार आहे. आज दुपारी 4 वाजता ही सुनावणी होणार आहे.
याआधी 10 जानेवारीला झालेल्या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे आणि शिंदे गटाने जोरदार युक्तीवाद केला. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत सुनावणी घेऊ नका अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली होती. तर सुप्रीम कोर्टाने कोणालाही अपात्र ठरवलेलं नसल्यामुळे चिन्हाचा निर्णय घेण्यास हरकत नाही, असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारीला संपत आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून निकाल द्या किंवा संघटनात्मक निवडणुकीची परवानगी द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्रं सादर केली आहेत.
शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवले आहे. मुंबईतील अंधेरी-पूर्व निवडणुकीच्या निमित्ताना निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व निवडणुकीत हे चिन्ह वापरता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. या निर्णयाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
जरी निर्णय तात्पुरता असला तरी निवडणूक आयोगाने आपल्या निकालात स्पष्ट केले होते की, जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही म्हणजे धनुष्यबाण नेमकं कुणाचं आहे हे आम्ही सगळी कागदपत्रं बघून अंतिमपणे ठरवत नाही, तोपर्यंत हा निर्णय लागू असेल. आता दोन्ही बाजुंच्या कागद पत्राच्या पुरावाची सुनावणी पूर्ण झाली आहे. आता निकाल बाकी आहे.