• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
June 11, 2026
in इतर घडामोडी
0
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
0
SHARES
9
VIEWS

लक्ष्यांकित उद्दिष्टांच्या पुर्तीसाठी पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन

सोलापूर- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. राज्यात ‘मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम’ आता युद्धपातळीवर व मोहीम स्वरूपात सुरू करण्यात आली आहे. राज्यातील पशुधनाचे आरोग्य राखणे व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे हे आपले मुख्य ध्येय असून, निश्चित केलेल्या लक्ष्यांकित उद्दिष्टांच्या शंभर टक्के पूर्तीसाठी विभागाने काटेकोर नियोजन केले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली. या मोहिमेत सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या घटसर्प व फऱ्या यांसारख्या घातक आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीची गुणवत्ता टिकून राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. डॉ. किरण पाटील यांनी सांगितले की, लसीचा प्रभाव उत्तम राहण्यासाठी शीतसाखळी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवण्यात आले आहे. राज्यस्तरापासून ते थेट ग्रामीण भागातील उपकेंद्रांपर्यंत लस पोहोचवताना आवश्यक तापमान राखले जाईल, यासाठी अद्ययावत कोल्ड बॉक्सचा वापर केला जात आहे.

मोहीम यशस्वी करण्यासाठी विभागामार्फत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्हा व तालुका पातळीवर आवश्यकतेनुसार लसींचा पुरेसा साठा आधीच वितरित करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली असून, ती प्रत्यक्ष गावागावांत व गोठ्यांपर्यंत पोहोचून ‘डोअर स्टेप’ पद्धतीने लस टोचणी करत आहेत. एकाही जनावराचे लसीकरण सुटणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पशुपालकांना आवाहन
पावसाळ्यात जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ऐनवेळी येणारे संकट आणि होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पशुपालकांनी आपल्या गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्यांचे मान्सूनपूर्व लसीकरण करून घ्यावे. यासाठी आपल्या जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

‘भारत पशुधन प्रणाली’वर तात्काळ नोंदणी
यावेळच्या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लसीकरणाचे पारदर्शक डिजिटल ट्रॅकिंग होय. मा. आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सर्व पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत की, प्रत्येक पशुधनाला लस टोचल्यानंतर त्याची नोंद ‘भारत पशुधन प्रणाली’ (NDLM Portal) या केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर रिअल-टाइम करणे आवश्यक आहे. पशुधनाचे टॅगिंग (12 अंकी बिल्ला) करूनच ही नोंदणी केली जावी, जेणेकरून मोहिमेच्या प्रगतीवर थेट देखरेख ठेवता येईल व बोगस नोंदींना आळा बसेल.अशी माहिती सहआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय (पशुधन व नियोजन) ,पुणे यांनी दिली आहे.

Previous Post

आदीला नदी की नाला..! वर्षभर महापालिका आणि पाटबंधारे विभागात टोलवाटोलवी..!

Next Post

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026