माघवारी मध्ये गोल रिंगण चार व एक उभे रिंगण होणार

0
107

अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून माघवारी पालखी सोहळा 2023 मध्ये यंदा गोल रिंगण चार व एक उभे रिंगण केले जाणार आहे. राष्ट्रिय अध्यक्ष ह भ प सुधाकर महाराज इंगळे यांच्या मार्गदर्शनाने व राष्ट्रिय उपाध्यक्ष ह भ प भागवत महाराज चवरे पंढरपूर यांच्या उपस्थीती मध्ये हा सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.

  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी या दोन्ही पालखीचे पूजन चीठ्ठी व्दारे नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकारी व मान्यवर , पद्मशाली ज्ञाती संस्था यांचे हस्ते श्री मार्कंडेय मंदिर, पंचकट्टा सोलापूर येथे करण्यात येणार आहे. वारकरी परंपरेतील रिंगण सोहळा हा अतिशय प्रेरणादायी असा सोहळा आहे. रिंगण म्हटले की अबाल वृद्धांना उत्साहित करून महिलांना ही प्रेरित करणारा आहे. प्रत्येक दिंडीतील विणेकरी हे वृद्ध असतात. तरी सुद्धा ते रिंगणामध्ये तरूनांप्रमाणे धावतात. माघवारी पालखी सोहळा परंपरेने चालत आला आहे. यामध्ये 2012 साली पहिले रिंगण होम मैदान येथे सुरु केले. या सोहळ्यास बारा वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे तपपूर्ती वर्ष म्हणून मोठी परंपरा सुरु होत आहे. यंदा या सोहळ्यामध्ये चार गोल रिंगण व एक उभे रिंगण केले जाणार आहे.

1) दि.27-01-2023 रोजी “गोल रिंगण” दु. 4.30 वा. नॉर्थकोट प्रशाला , सोलापूर
( हे रिंगण आषाढी वारीतील माऊलींचे अश्व करणार आहेत.)
2) दि. 29-01-2023 रोजी “गोल रिंगण” सकाळी 9.00 वा. पाटकर वस्ती कुरूल ता. मोहोळ जि. सोलापूर
3) दि. 30 -01-2023 रोजी “गोल रिंगण” सकाळी 9.00 वा. महात्मा गांधी विद्यालय, पेनुर ता. मोहोळ जि. सोलापूर
4) दि. 30 -01-2023 रोजी “गोल रिंगण” दु. 5.00 वा. दत्त प्रशाला , सुस्ते ता. पंढरपूर, जि. सोलापूर
5)) दि. 31 -01-2023 रोजी सकाळी 9.00 वा.” उभे रिंगण” जलाराम महाराज मठ, पंढरपूर

  असे नियोजन प्रतिवर्षा प्रमाणे करण्यात आले आहे. हा सोहळा यशस्वी करणेसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील दिंडी प्रमुख व ह भ प मधुकर गायकवाड (समिती अध्यक्ष), जोतीराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव), किसन बापू कापसे (प्रदेश उपाध्यक्ष), मोहन शेळके (प्रदेश सचिव), बंडोपंत कुलकर्णी (जिल्हा अध्यक्ष), संजय पवार (शहर अध्यक्ष),  शंकर भोसले (समिती अध्यक्ष), किरण चिप्पा (शहर सहअध्यक्ष), श्रीकांत ढगे (पालखी प्रमुख) , सचिन गायकवाड (शहर उपाध्यक्ष), पांडुरंग घाटे, इ.पदाधीकारी परिश्रम घेत आहेत.