सोलापूर ते गोवा या फ्लाय 91 ने सुरु केलेल्या विमान सेवेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. 15 जून 2023 रोजी विमानसेवीला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर कारखान्याची बेकादेशीर चिमणी पाडली त्यानंतर 2 वर्षांनी 9 जून 2025 रोजी मोठ्या थाटात सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा प्रारंभ झाला. सोलापूर विमानतळावर कमी असल्यामुळे व्हिजिबिलिटी असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला आले नव्हते त्यामुळे केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या विमानसेवेचा प्रारंभ झाला. पहिल्या फ्लाईटने गोव्याहून सोलापूरला आलेल्या तर सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचे मुरलीधर मोहोळ यांच्या स्वागत करण्यात आले. त्यादिवशी विमानतळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुरलीधर मोहोळ यांनी जोशपूर्ण भाषण केले. लवकरच सोलापूर ते तिरुपती ही विमान सेवा सुरू करू असं त्यांनी दिलेलं आश्वासन वर्ष झालं तरी पूर्ण झालं नाही. सोलापूरच्या विमानतळावरील नाईट लँडिंग चा विशेष सोडवू तसेच पावसाळ्यात देखील धावपट्टी दिसावी यासाठी लागणारी अत्याधुनिक अशी रनवे व्हिज्युअल रेंज सिस्टीम बसवण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. आज वर्ष पूर्ण झाले तरीही हवाई मंत्र्यांचे हे आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे हवेतच आहे. मुरलीधर मोहोळ यांनी वर्षापूर्वी केलेली ही महत्त्वाची वक्तव्य..
नाईटलाइंडिंग ची सुविधा नाही तसेच धावपट्टी व्हिजिबिलिटी बाबत अत्याधुनिक यंत्रणा नसल्यामुळे सोलापूर ते गोवा ही फ्लाय 91 ची फ्लाईट 19 जून पासून पुढे तीन महिन्यासाठी बंद राहणार आहे. सोलापुरातून 17 एप्रिल पासून फ्लाय 91 ने हैदराबाद साठी देखील सेवा सुरू केली होती. तर 15 ऑक्टोबर पासून स्टार एअर या कंपनीने सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू केली आहे. मुंबई विमानसेवेसाठी प्रति रिकाम्या सीट साठी शासनाकडून 3250 रुपये एवढे अनुदान दिले जात आहे. त्यामुळे सोलापूरची विमान सेवा सुरळीतपणे चालण्यासाठी नाईट तसेच आधुनिक यंत्रणा बसवणे गरजेचे आहे.










