• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; सांगली कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

Yes News Marathi by Yes News Marathi
July 31, 2023
in इतर घडामोडी
0
तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; सांगली कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण
0
SHARES
1
VIEWS

सांगली ( सुधीर गोखले) – तेलंगणा सीएम के चंद्रशेखर राव हे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. उद्या 1 ऑगस्ट रोजी हैदराबादहून कोल्हापूर विमानतळावर केसीआर यांचे आगमन होईल. त्यांच्या कोल्हापूर आणि सांगलीत भेटीगाठी होणार आहेत. काही दिवसांपूर्वी आशादी एकादशी निमित्त त्यांनी पंढरपूर येथे श्री पांडुरंगाचे दर्शन घेतले होते. आता उद्या ते सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त होणाऱ्या सभेला उपस्थित राहणार असून दुपारी दोन वाजता शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्याकडे भोजनासाठी थांबणार आहेत त्यावेळी दोघांच्यात बी आर एस पक्षासाठी काम करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षबांधणीसाठी जोरदार प्रयत्नशील असलेल्या आणि सत्ताधाऱ्यांच्या छुप्या मदतीने महाराष्ट्रात राजकीय दौरे करत असल्याचे आरोप होत असलेले तेलंगणाचे सीएम के. चंद्रशेखर राव पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी आता केसीआर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. केसीआर उद्या 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर येत आहेत. 

तेलंगणाचे सीएम के. चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्याबद्दल …

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. उद्या 1 ऑगस्ट रोजी हैदराबादहून कोल्हापूर विमानतळावर केसीआर यांचे आगमन होईल. त्यानंतर बाय रोड ते सांगलीमधील वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या साखराळे येथील घरी दुपारी दोन वाजता के. चंद्रशेखर राव यांच्यासाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी पोहोचणार आहेत. यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा हैदराबादकडे प्रयाण करतील.  

रघुनाथदादा पाटील बीआरएसमध्ये प्रवेश करणार?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची झालेली दुर्दशा हा कळीचा मुद्दा झाला आहे. या पार्श्वभूमीवर केसीआर यांच्याकडून राज्यात पक्षवाढीसाठी शेतकरी नेत्यांनाच गळ घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनाही त्यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र, शेट्टी यांनी त्यांची ऑफर नाकारली आहे. गेल्या काही  महिन्यांपासून साईडलाईन झालेल्या शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या घरी केसीआर भेट देणार आहेत. भोजनाचाही कार्यक्रम रघुनाथदादा पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे रघुनाथदादा पाटील केसीआर यांच्या बीआरएसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली आहे. रघुनाथदादा पाटील सध्याच्या राजकारणात पूर्णत: बाजूला गेले आहेत. त्यामुळे अब की बार किसान सरकार म्हणून वातावरण निर्मिती करत असलेल्या केसीआर यांच्या पक्षात प्रवेश करून आगामी वाटचाल करण्याची चर्चा सांगली जिल्ह्यात रंगली आहे. कोल्हापूरमध्ये बॅनरबाजीदरम्यान, केसीआर यांनी महाराष्ट्रावर  लक्ष केंद्रित केल्यानंतर कोल्हापूरमध्येही काही दिवसांपूर्वी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. कोल्हापूर शहरातील सर्वच प्रमुख चौकामध्ये केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचे बॅनर्स लागले होते. या पार्श्वभूमीवर उद्या सांगलीसह कोल्हापूरमध्येही काही राजकीय भेटीगाठी होणार का? याकडेही लक्ष आहे.   
 
Tags: Kolhapur districtMaharashtraSangliTelangana CMvisit
Previous Post

शरद पवारांनी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करु नये : संजय राऊत

Next Post

‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

'मेरी माटी मेरा देश' हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026