• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 18, 2026
in इतर घडामोडी
0
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
0
SHARES
1
VIEWS

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष सोलापूर अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये नुकताच ‘गणेशोत्सव व गौरी गणपती महोत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात पार पडला. या महोत्सवाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तब्बल १ कोटी ६५ लाख १८ हजार ७६३ रुपयांची बंपर उलाढाल करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या ५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी ५५,७६४ गणेशमूर्तीं खरेदी करून महिला बचत गटांच्या मूर्तींना पसंती दिली. सदरचे स्टॉल हे सर्व पंचायत समित्या, बस स्थानके, सर्व गावात आणि मुख्य गर्दीच्या ठिकाणी एकूण १६३ विक्री केंद्रे आणि स्टॉल्स उभारण्यात आले होते.ठोक आणि किरकोळ विक्रीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

यावेळी बोलताना प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप म्हणाले की,दिनांक ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या महोत्सवात केवळ किरकोळच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती आणि इतर साहित्याची विक्री झाली. सोलापूर शहरातील नागरिक, जिल्ह्यातील ग्राहक आणि प्रभाग संघाच्या सदस्यांनी या स्टॉल्सला भेट देऊन खरेदीला भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये माळशिरस तालुक्याने सर्वाधिक ६४ लाख ८५ हजार रुपयांची कमाई करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर करमाळा आणि मोहोळ तालुक्यांनीही २० लाखांपेक्षा जास्त उलाढाल केली आहे.या महोत्सवात केवळ पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच नव्हे, तर महिलांनी स्वतः तयार केलेल्या शोभेच्या वस्तू, मकर, आरास साहित्य, हस्तकलेच्या वस्तू आणि आकर्षक हार यांची विक्री करण्यात आली. ग्रामीण भागातील दीदींना ‘लखपती दीदी’ करण्यासाठी उमेद अभियानामधून सोलापूर जिल्ह्यात सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, तालुका अभियान व्यवस्थापक शैला केशवदास, गणेश पाटील, सुषमा बिचकुले, अवधूत देशमुख, उमेश डांगे, रणजीत शेंडे, उमेश जाधव, कृणाल पाटील, आण्णा आवताडे, पूनम दुध्याळ, शिवाजी वाघमारे, तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक यांनी परिश्रम घेतले.

तालुकानिहाय विक्री अहवाल,
:माळशिरस: २१ स्टॉल्स | ८,९८२ मूर्ती विक्री ₹६४,८५,०००/- मोहोळ: १२ स्टॉल्स | ६,२२२ मूर्ती विक्री ₹२२,६४,०८८करमाळा: ३९ स्टॉल्स | ७,५३० मूर्ती विक्री |₹१९,११,१८५ दक्षिण सोलापूर: ४ स्टॉल्स | ६,००० मूर्ती विक्री ₹१२,६०,००० उत्तर सोलापूर: १० स्टॉल्स | २,०८५ मूर्ती विक्री ₹६,९१,७७० सांगोला: १६ स्टॉल्स | ६,४३८ मूर्ती विक्री ₹८,८७,१४० माढा: १८ स्टॉल्स २,८५० मूर्ती विक्री ₹६,१७,२००अक्कलकोट: ६ स्टॉल्स | २,६८९ मूर्ती विक्री ₹६,०७,५३०मंगळवेढा: ४ स्टॉल्स | १,०७३ मूर्ती विक्री ₹६,००,८८०बार्शी: १५ स्टॉल्स | ७,५५८ मूर्ती विक्री ₹५,६५,०००पंढरपूर: १८ स्टॉल्स | ४,३३७ मूर्ती विक्री ₹३,५८,९७०

एकूण सोलापूर जिल्हा: १६३ स्टॉल्स | ५५,७६४ मूर्ती विक्री | एकूण विक्री: ₹१,६५,१८,७६३

“ग्रामीण भागातील महिलांच्या हातातील कौशल्याला बाजारपेठ आणि त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळवून देणे, हे ‘उमेद’ अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींना नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि झालेली विक्रमी विक्री ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने मिळालेली मोठी पावती आहे. भविष्यातही महिलांच्या उत्पादनांना अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्नशील राहील.”
— कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर-

Previous Post

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

Next Post

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

Related Posts

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा
इतर घडामोडी

निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा

September 17, 2026
Next Post
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026