‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

0
41

सोलापूर :-जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम दिनांक 9 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोप सोहळा च्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी रोहियो चारुशीला देशमुख, महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरणकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर क्षमा यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश उपक्रमात जिल्हा परिषद व सोलापूर महापालिकेची महत्वाची भूमिका आहे. तसेच सर्व तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी तालुका स्तरावर स्वतंत्र बैठका घेऊन या कार्यक्रमाचे तंतोतंत नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

 प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर जोशीला फलक लावण्यात येणार आहे त्या फलकावरील वीरांच्या नावासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे व नावे निश्चित करावीत. तालुकास्तरावर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी चोखपणे आपली भूमिका बजावावी. नेहरू युवा केंद्राच्या मदतीने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग या कार्यक्रम कालावधीत घ्यावा, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या.

  प्रारंभी रोहियो उपजिल्हाधिकारी श्रीमती देशमुख यांनी अमृत महोत्सव समारोप सोहळा अंतर्गत मेरी माटी मेरा देश हा उपक्रम जिल्हा व तालुका सरावर राबवण्याबाबत सूचना आलेल्या असून त्या अनुषंगाने प्रत्येक शासकीय विभागाची जबाबदारी सांगून दिनांक 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हा उपक्रम कशा पद्धतीने राबवायचा याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली.

   मेरी माटी मेरा देश उपक्रमाचे दोन भाग असून पहिल्या भागात शिलाफलक लावणे, पंचप्राण प्रतिज्ञा, वृक्षरोपण, वीरा का वंदन व ध्वजारोहण हे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर शिलाफलक तयार करून ते लावायचे आहेत. त्या फलकावर वीरांची नावे असणार आहेत. नावांची निवड विशेष ग्रामसभा आयोजित करून सभेत अंतिम करावयाची असून नावांची संख्या खूप मोठी झाली असेल तर एकापेक्षा अधिक शिलाफलक लावावेत अशी माहिती श्रीमती देशमुख यांनी दिली.

 जिल्ह्यात अमृत सरोवरांची संख्या 143 असून या सर्व सरोवर ठिकाणी रोज स्तंभ उभारून ध्वजारोहण करणे अनिवार्य आहे. यासाठी जलसंधारण विभागाने योग्य ती दक्षता घ्यावी. मातीचे दिवे लावून पंचप्राण प्रतिज्ञा करण्यात येणार आहे. वृक्षरोपण करून वसुधा वंदन करण्याचे नियोजित आहे. त्या पद्धतीने प्रत्येकाने नियोजन करावे तसेच दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, अशी माहिती श्रीमती देशमुख यांनी दिली.

   जिल्ह्यातील सर्व नागरी भागात याच पद्धतीने कार्यक्रम घेण्यात येतील. या अंतर्गत मिटटी यात्रा हा एक कार्यक्रम होणार असून या अंतर्गत जिल्ह्याच्या प्रत्येक गावातून एक युवक एका कलशामध्ये माती घेऊन तो कलश पंचायत समिती स्तरावरील कार्यक्रम ठिकाणी आणला जाईल. तसेच जिल्ह्याच्या 11 पंचायत समिती ठिकाणाहून 11 कलश देश पातळीवरील कार्यक्रमासाठी पाठवण्यात येतील. देश पातळीवरील मुख्य कार्यक्रम नवी दिल्ली येथे होणार असून मिट्टी यात्रा अंतर्गत संपूर्ण देशभरातून आलेले कलश मधील माती ठेवण्यासाठी त्या ठिकाणी अमृतवाटिका तयार करण्यात आल्याची माहिती ही श्रीमती देशमुख यांनी दिली.

या बैठकीस दूरदृश्य प्रणालीव्दारे तालुक्यातील सर्व तहसिलदार व गटविकस अधिकारी उपस्सिथत होते.