येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूरच्या उत्तर तहसील कार्यालयाचा नायब तहसीलदार चंद्रकांत काशिनाथ हेडगिरे याला पन्नास हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही घटना कार्यालयात सायंकाळी सातच्या सुमारास घडली. मंडल अधिकाऱ्याचे थकलेले वेतन काढण्यासाठी या लाचखोराने 60 हजारांची मागणी केली होती.
या याबाबत तक्रारदाराने पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाकडे तक्रार दिली असता सोमवारी सायंकाळी सापळा लावून त्याला रंगेहात पकडले.जुळे सोलापुरातील शिवरत्न नगर येथील त्याच्या घराच्या झडतीत घरात साठ हजार रुपयांची कॅश व काही ऐवज सापडल्याची माहिती सूत्रांना दिली.ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्या पथकाने केली असून याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला.

