मोहोळ तालुक्यामध्ये सीना नदीला आलेल्या महापुरामुळे पूरग्रस्त शेतकऱ्याकडे डीपी साठी पैसे मागणारा लांबोटीचा कनिष्ठ अभियंता ओंकार विष्णू साठे याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. संबंधित शेतकऱ्याकडे नदीकाठी पडलेले विद्युत पूल व डीपी बसवून देण्यासाठी पैशाची मागणी केली होती. याबाबत वीज वितरण कंपनीच्या शाखा अभियंताला तात्काळ निलंबित करा अशी मागणी आमदार राजू खरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न करीत केली होती. या घटनेची राज्य शासनाने तातडीने दखल घेत सोलापूर जिल्हा ग्रामीणचे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मनीष कुमार सूर्यवंशी यांनी संबंधित शाखा अभियंत्याला निलंबित केले आहे.

