सोलापूर : कोरोनामुळे गेली दोन दिवस सैफुल चौकात एका झाडाखाली वयोवृधद व्यक्ती आपली पत्नी सुमन कोळी (गांव-अंत्रोळी)कोविड रूग्ण घेऊन बेड मिळत नसल्यामुळे बसले होते. काल रात्री पासुन आॅक्सिजन पातळी पुर्ण खालावली होती तात्काळ ही बातमी समजली असता घटनास्थळी आर.पी.आय चे नेते राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे शाम मामा धुरी, देवा बुधवतराव,निलेश कोळी,विशाल गुरव त्याठिकाणी जाऊन त्या रुग्णवाहिका बोलावून त्या रुग्णाला ऑक्सिजन लावून तो रुग्ण पुढे काडादी कोव्हिड सेंटर ला पोहचवन्यात आला .कोरोनाच्या काळात आपण राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्यापासून काम करत असल्याची माहिती यावेळी कार्यकर्त्यांनी दिली.









