सोलापूर : 16 डिसेंबरला दुपारी 2 वाजेपर्यंत सोलापूर बंदसोलापूर : सोलापूर येथे 16 डिसेंबर चा बंद हा शिवभक्तांनी आयोजित केला आहे. यात पक्षीय राजकारणाचा संबंधच नाही ज्यांना राष्ट्रपुरुषाबद्दल अभिमान आहे ते सर्वजण यात सहभागी होतील असं आज शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सांगण्यात आलं.
16 डिसेंबर चा बंद दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. सकाळी 9 वाजल्यापासून कार्यकर्ते रॅली काढून सोलापुरातील सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होईल. ज्यावेळी बंदची घोषणा झाली त्यावेळी आता विरोधात जाणाऱ्या पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित होते त्यांची भूमिका का बदलली? असा सवाल करण्यात आला . या पत्रकार परिषदेस पुरुषोत्तम बर्डे, चेतन नरोटे, राजन जाधव, नाना काळे, भारत जाधव,श्रीकांत डांगे, शेखर फंड ,भाऊ रोडगे, शिवाजी वाघमोडे आदी उपस्थित होते.