• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
August 18, 2026
in इतर घडामोडी
0
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
0
SHARES
3
VIEWS

सहकारमहर्षी कै. वि. गु. शिवदारे जन्मशताब्दी सांगता समारंभात प्रतिपादन; मान्यवरांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान

सोलापूर : माजी आमदार वि. गु. शिवदारे यांनी सोलापूर आणि परिसराच्या विकासात मोलाचे योगदान दिले. शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! अशा शब्दात आमदार बसवराज पाटील यांनी शिवदारे अण्णांच्या कार्याचा गौरव केला.

श्री. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने सहकारमहर्षी कै. वि. गु. शिवदारे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात झाला. या कार्यक्रमात आमदार बसवराज पाटील बोलत होते.

या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि पाण्याचे अभ्यासक रजनीश जोशी यांनी सोलापूरच्या जल-नियोजनावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील (मुरुमकर) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी केले.

आमदार बसवराज पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘आण्णांनी सर्वच क्षेत्रांत प्रेरणादायी कार्य केले असून विधिमंडळातही त्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. आण्णा म्हणजे या परिसराची मोठी संपत्ती होते आणि त्यांचा हा कार्याचा वारसा राजशेखर शिवदारे समर्थपणे पुढे नेत आहेत. सोलापूरचा परिसर महाराष्ट्रात राहिला पाहिजे यासाठीही अण्णांनी मोठे प्रयत्न केले. खास करून दक्षिण सोलापूरच्या परिसराला विकासाच्या वाटेवर आणण्याचे काम अण्णांनी केले.’

समाजात दीर्घकाळ उल्लेखनीय व समर्पित कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या वेळी ‘जीवन गौरव पुरस्कार व सन्मानचिन्ह’ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सोलापूरचे प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. वीरेंद्र अवस्थी आणि सौ. अनुराधा अवस्थी यांचा सन्मान करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांना जाहीर झाला असून त्यांच्या वतीने बंधू अमर कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल बार्शीचे प्रगतिशील शेतकरी दिनकर गुंड आणि सौ. गुंड यांना सन्मानित करण्यात आले, तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान संचलित यमगरवाडी येथील एकलव्य आश्रम शाळेचा गौरव करण्यात आला. ॲड. प्रदीपसिंह राजपूत, संतोष शिर्के आणि अशोक संकलेचा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यासोबतच शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त प्रणव बिराजदार, गंगाधर बिराजदार आणि शिवानंद शिंगडगाव यांचाही गौरव करण्यात आला, तसेच जलतरण स्पर्धेत उत्तम यश मिळवल्याबद्दल श्रद्धा किनगी – यलगाम यांना प्रोत्साहनपर सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार, पाण्याचे अभ्यासक रजनीश जोशी यांनी ‘सोलापूर जिल्ह्याचे जल-नियोजन’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. पाण्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आपण जिंती ते हल्ली हिळ्ळी असा नदीकाठाने प्रवास केल्याचे सांगत ते म्हणाले की, सिद्धेश्वर महाराजांनी लोकसहभागातून तलाव खोदून पाणी उपलब्ध करून दिले होते आणि आजच्या काळातही लोकसहभागातून जलव्यवस्थापन करणे नितांत गरजेचे आहे. सोलापूर जिल्हा हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असून येथे केवळ ४५ दिवसांचा पावसाळा असतो आणि जिल्ह्यात सरासरी ५५० मिलिमीटर इतकाच पाऊस पडतो. आपल्याकडे प्रामुख्याने परतीचा पाऊस येत असल्याने वार्षिक पाऊस हीच आपली ‘जल कमाई’ मानून पडणारा प्रत्येक थेंब साठवला पाहिजे. गावातील पाऊस गावातच अडवून शेतजमिनीत साठवला पाहिजे आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी जलपुनर्भरण करणे आवश्यक आहे. उजनी धरणात ११७ टीएमसी पाणी साठवले जात असले, तरी नद्या आणि कालवे एकमेकांना जोडून वाहून जाणारे पाणी अडवले पाहिजे. वेळीच पाण्याचे योग्य नियोजन केले नाही, तर सोलापूरसमोर गंभीर संकट उभे राहील आणि जिल्हा ‘डार्क झोन’मध्ये जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच शिवदारे आण्णांनीही लोकसहभागातून अशी अनेक कामे उभी केली होती, अशा आठवणी त्यांनी या वेळी जागवल्या.

या प्रसंगी सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, माजी अध्यक्ष प्रकाश वाले, भारती शिवदारे, सुचेता थोबडे, रूपाली बिराजदार, सुरेखा गंभीरे यांच्यासह बँकेचे सर्व संचालक मंडळ, प्रतिष्ठानचे विश्वस्त, प्रतिष्ठित नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शुभदा उपासे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. बाहुबली दोशी यांनी मानले.

Previous Post

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

Next Post

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

October 4, 2026
विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

October 4, 2026
शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026