• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

Yes News Marathi by Yes News Marathi
August 18, 2026
in इतर घडामोडी
0
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
0
SHARES
1
VIEWS

नागपंचमीनिमित्त आस्था रोटी बँकेकडून २०० निराधार व गरजू महिलांना स्नेहभेट

सोलापूर : कुणाच्या घरी सणाच्या दिवशी गोडधोडाचा सुगंध दरवळतो, नवीन वस्तूंची खरेदी होते आणि कुटुंबासोबत आनंद साजरा होतो… पण याच समाजात काही माऊली अशाही आहेत, ज्यांच्यासाठी “आज सण आहे” यापेक्षा “आज पोटाला अन्न मिळेल का?” हा प्रश्न अधिक मोठा असतो. अशाच निराधार, गरजू आणि वंचित महिलांच्या आयुष्यात नागपंचमीचा आनंद घेऊन जाण्याचे काम आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक, सोलापूर यांनी केले.


“जिथे भाकरीसोबत माया वाटली जाते आणि मदतीसोबत माणुसकी जपली जाते” या भावनेतून नागपंचमीनिमित्त शहरातील विविध भागांतील तब्बल २०० आजी-माऊली व गरजू महिलांना स्नेहभेट किटचे वाटप करण्यात आले.

आपल्यासाठी मेहंदी, बांगड्या, टिकली किंवा कानातले या छोट्या गोष्टी असतील; पण आयुष्यभर परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या एखाद्या निराधार माऊलीच्या हातावर मेहंदी रंगते, हातात बांगड्या खणखणतात आणि चेहऱ्यावर हसू उमटते, तेव्हा ती भेट केवळ वस्तू राहत नाही—ती “आपलीही कुणीतरी आठवण ठेवते” याची जाणीव बनते.

या स्नेहभेट किटमध्ये मेहंदी, नेलपॉलिश, चिमटा, मोत्याची माळ, कंगवा, पावडर, हातरुमाल, बांगड्या, कानातले आणि टिकली अशा महिलांच्या उपयोगातील वस्तूंचा समावेश होता.

मातोश्री मुलींचे आश्रम, आधार आश्रम, कुष्ठरोग वसाहत तसेच शहरातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरीब, गरजू व निराधार महिलांपर्यंत तसेच अंध व अपंग बांधवांपर्यंत आस्था रोटी बँकेच्या कार्यकर्त्यांनी हा सणाचा आनंद पोहोचविला.

काहींच्या आयुष्यात सण येतात आणि जातात; मात्र गरिबीमुळे सण साजरा करण्याची संधीचमिळत नाही. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असताना मेहंदी, बांगड्या किंवा सणाची भेट घेणे त्यांच्यासाठी स्वप्नासारखे असते. त्यामुळे या छोट्याशा स्नेहभेटीने अनेक महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि त्यांच्या डोळ्यांतील समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले.

आस्था रोटी बँक केवळ सण-उत्सवाच्या दिवशीच नव्हे, तर वर्षभर सोलापूर शहरातील गोरगरीब, गरजू, निराधार, अंध, अपंग, कुष्ठरोग वसाहतीतील नागरिक तसेच सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दररोज मोफत अन्नदान करत आहे.

“आमच्यासाठी सण म्हणजे स्वतःच्या घरात दिवा लावणे नव्हे, तर परिस्थितीने ज्यांच्या आयुष्यात अंधार केला आहे, त्यांच्या चेहऱ्यावर थोडेसे हास्य फुलवणे. कोणीही उपाशी राहू नये आणि कोणालाही आपण एकटे आहोत असे वाटू नये, हाच आस्था रोटी बँकेचा प्रयत्न आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
या सेवाभावी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वंदना सोमशेट्टी, राघवेंद्र सोमशेट्टी, सौजन्य आले, अंबिका गुरव, अनिता हिरेमठ, जगदेवी स्वामी, यमुना गड्डम आणि राधा वहिनी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुष्कर पुकाळे, विद्या सिंगम, स्नेहा मेहता, संगीता छचुरे, सुरेखा पाटील, विनोद भोसले, अनिता तालीकोटी व विजय छचुरे यांच्यासह आस्था रोटी बँकेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

“त्या माऊलीच्या हातातील बांगड्यांची खणखण हीच आमच्यासाठी नागपंचमीची खरी पूजा… आणि तिच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हाच आमच्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद!”

Previous Post

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

Next Post

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

October 4, 2026
विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

October 4, 2026
शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026