मनपा क्षेत्रामध्ये पान विक्री दुकानांमधून अमली पदार्थांची विक्री; प्रशासनाने बजावल्या दुकानांना नोटीस; दुकानदारांमध्ये खळबळ

0
40

सांगली ( सुधीर गोखले) – अलीकडील काही दिवसांमध्ये काही पान दुकानांमधून नशेच्या गोळ्या, अमली पदार्थ आणि तत्सम पदार्थांच्या विक्रीची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती महापालिका क्षेत्रातील सर्वच पान दुकानांना आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्याने पान विक्री करणाऱ्या दुकानदारनामध्ये खळबळ उडाली आहे तर अशा प्रकारचे गैर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे मात्र जे पान दुकानदार सुरळीत व्यवसाय करत आहेत विनाकारण त्यांच्याही व्यवसायावर परिणाम होण्याची श्यक्यता निर्माण झाली असून विनाकारण पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासन यांच्या कडून नाहक त्रास होऊ नये असे या दुकानदारांचे म्हणणे आहे. 

शहरातील काही पान विक्री दुकानदारांकडून अमली पदार्थांची, नशेच्या गोळ्यांची छुपी विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळताच महापालिका आरोग्य विभागाचे डॉ रवींद्र ताटे आणि डॉ वैभव पाटील यांची जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांचे समवेत बैठक झाली तर यामध्ये पान विक्री दुकानदारांना नोटिसा बजावण्यासंबंधी निर्णय होऊन मनपा क्षेत्रामधील पान विक्री दुकानदारांना नोटिसाही बजावल्या मात्र ज्या दुकानांमधून साधी सिगारेट किंवा विडी विकली जात नाही अथवा फक्त मसाले पान अथवा खाऊचे पान मिळते अशा दुकानांना सुद्धा या नोटिसी प्राप्त झाल्याने दुकानदारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून जे खरोखरच गैर कृत्य करत असतील अशा पद्धतीने अमली पदार्थ किंवा नशेच्या गोळ्या विकत असतील त्या पान दुकानदारांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी मात्र चोर सोडून संन्याशाला फाशी नको असे पान विक्रेत्या दुकानदारांचे म्हणणे आहे या संदर्भात येत्या शनिवारी जिल्हाधिकारी प्रशासनाबरोबर आम्ही चर्चा करणार असल्याचे पान विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

 महापालिका आरोग्य विभागाने बजावल्या नोटिसी मध्ये म्हणले आहे कि आरोग्यास घातक असलेल्या खुल्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे सबब पण विक्रेत्या दुकानदारांनी अमली पदार्थ नशेच्या गोळ्या किंवा तत्सम पदार्थांची विक्री होणार नाही यांची पूर्णपणे दक्षता घ्यावी याचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल.