शंभर निराधार वृध्दांना आधार देणाऱ्या रोटरी अन्नपूर्णा योजनेचे १६ वर्ष पूर्ति…

0
29

गतकाळात आर्थिक सुबत्ता व संपन्नता असलेल्या आणि नंतर विपन्नावस्थेत गेलेल्या तसेच नातीगोतीही केवळ नावापुरतीच ठरलेल्या उपेक्षित, निराधार अशा शंभर वृध्द माता-पित्यांसाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूर ही संस्था ‘काठीचा आधार’ बनली आहे. या वृध्दांसाठी गेल्या १६ वर्षांपासून रोटरी अन्नपूर्णा योजना कसलाही खंड न पडता अव्याहतपणे सुरु आहे. येत्या ४ ऑगस्ट रोजी या योजनेस १६ वर्षे पूर्ण होत आहे.

रोटरी क्लब ऑफ सोलापूरने २००७ साली तत्कालीन अध्यक्ष सीए राजगोपाल मिणियार यांच्या पुढाकारातून व आचार्य किशोरजी व्यास यांच्या प्रेरणेनेने अन्नपूर्णा योजनेची सुरुवात केली होती. प्रथम वर्षी ‘सुगरण’च्या मीनाबेन शहा यांनी ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर या अन्नपूर्णा योजनेसाठी स्वयंपाक करुन दिली. त्यानंतर मागील १५ वर्षे चंद्रिका चौहान यांच्या उद्योगवर्धिनी महिला बचत गटाच्या सहाय्याने दररोज शंभर वृध्दांसाठी स्वंयपाक करुन दिला जातो. मागील १६ वर्षात वर्षात या योजनेत एका दिवसाचाही खंड पडला नाही. प्रत्येक वृध्दाकडे घरपोच ताज्या व गरम जेवणाचा डबा अगदीवर वेळेवर पोहोचविला जातो. याचे श्रेय सेवाव्रती रिक्षाचालक श्री शरणय्या हिरेमठ यांना दिले जाते. आजपर्यंत सुमारे ५,८४,५०० डबे, सुमारे १ कोटी ९० लाख खर्च या योजने अंतर्गत केलेे गेले आहे. या योजनेसाठी रोटरी क्लबद्वारा एक विशेष समिती कार्यरत ओह ती दैनंदिन व्यवहारकडे अत्यंत काटेकोरपणे लक्ष ठेवत असते. डाक विभागातर्फे रोटरी क्लब सोलापूरच्या ७५ वर्षानिमित्ताने प्रसिध्द करण्यात आलेल्या विशेष टपाल पाकिटावर रोटरी अन्नपूर्णा योजनेस विशेष प्राधान्य देण्यात आले होते.


या संदर्भात रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष रोटे. डॉ. ज्योती चिडगुपकर व या प्रकल्पाचे चेअरमन सुहास लाहोटी यांनी माहिती दिली. दररोजचे रुपये १३ द्या व वर्षाचे एकूण ४७६५ दिल्याने आपण एका वृध्दास दररोजचे अन्नदानाचे पुण्य मिळवा या युक्तिने सुरु केलेली या सेवाभावी योजनेसाठी सध्या प्रतिवर्षी सुमारे १२ लाखांचा खर्च होतो. हा खर्च भागविण्यासाठी एका वृध्दा व्यक्तीकरिता एका वर्षाच्या अन्नदानासाठी ८१०० रुपये इतक्या देणगीची योजना आखण्यात आली आहे. ही देणगी आयकर कलम ८० जी अन्वये वजावटीस पात्र आहे. या द्वारे उभारण्यात आलेल्या निधी ‘रोटरी कम्युनिटी वेल्फेअर ट्रस्ट’ च्या माध्यामातून याच योजनेसाठी वापरला जातो. समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थानी ही योजना पुढे नेण्याठी व तिचा विस्तार करण्यासाठी आार्थिक सहयोग द्यावा व असे आवाहन या योजनेचे समन्यवयक रोटे. सुहास लाहोटी यांनी केले आहे.


रोज सुग्रास भोजन घरपोच देण्यासह लाभार्थी वृध्दांची आरोग्य तपासणी करुन गरजेप्रमाणे औषधे दिली जातात. त्यांना जेवणासाठी भांडे, कपडे तसेच चादरीही उपलब्ध करुन दिल्या आहेत. एवढेच नव्हेतर मानसिक शांती व विरंगुळा मिळवा म्हणून लाभार्थी वृध्दांना पंढरपूर,अक्कलकोट, तुळजापूर या धार्मिक ठिकाणी सहलीवर नेले जाते. या सेवाभावी अन्नपूर्णा योजनेची दखल रोटरी इंटरनॅशनल घेत या प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट प्रकल्पाचा पुरस्कार दिला आहे. रोटरी अन्नपूर्णा योजनेच्या धर्तीवर अतरही अनेक सामाजिक संस्थांनी सोलापूर जिल्हयासह कराड, लातूर आदी ठिकाणी अशा प्रकारची योजना सुरु क़ेली असलयाची माहिती अध्यक्षा रोटे. डॉ. ज्योती चिडगुपकर यांनी दिली आहे.

रोटरी अन्नपूर्णा योजनेच्या १६ वर्ष पूर्ति कार्यक्रम सौ. अर्चना गायकवाड , उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांच्या उपस्थितीत आज शुक्रवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११. ०० वा जुना एम्प्लॉयमेंट चौक येथील उद्योगवर्धिनी च्या मंगल दृष्टी भवन,यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे सर्व लाभार्थ्यांना पंगतीत विशेष मिष्टाण जेवणाचा आस्वाद देण्यात येणार असल्याची माहिती या प्रकल्पाचे अध्यक्ष सुहास लाहोटी यांनी दिली आहे.