सोलापूर:- महायुतीने राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. यानंतर राज्यभरातून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून लाखो महिलांनी शासनाकडे त्या योजनेचा लाभ घेण्याकरता अर्ज दाखल केले आहेत. या योजनेचा लाभ सर्व महिलांपर्यंत योग्य पद्धतीने ला पोहोचवण्याकरता या योजनेत सुसूत्रता पारदर्शकता आणि सुलभता यावी याकरिता महापालिका हद्दीमध्ये झोन स्तरावर अशासकीय सदस्यांची नेमणूक आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यासंदर्भात नियुक्तीचे पत्र काढून केली आहे.
यामध्ये महायुतीचे एकूण 24 सदस्य असून आठ अध्यक्ष आहेत त्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ८ सदस्य आणि १ अध्यक्ष अशी संधी मिळाली असून या नूतन सदस्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनजी मुश्रीफ यांच्या शुभहस्ते आणि जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान, अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसिम बुऱ्हाण ज्येष्ठ नेते शफीभाई इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा लाभ सर्व सामान्य महीला माता भगिनींना मिळवून देण्यासाठी आपण काम कराल अशी आशा मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान ,अल्पसंख्यांक आदेश कार्याध्यक्ष वसीम बुरान ,ज्येष्ठ नेते शफी इनामदार ,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर ,कार्याध्यक्ष चित्रा कदम ,एडवोकेट सलीम नदाफ ,युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का, संघटक दत्तात्रय बडगंची, युवती अध्यक्ष किरण माशाळकर ,सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, अल्पसंख्यांक अध्यक्ष आमिर शेख, कार्याध्यक्ष संजीव मोरे, वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख, वैद्यकीय सेवा अध्यक्ष बसवराज कोळी,सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे,दक्षिण विधानसभा महिला अध्यक्ष प्रिया पवार, कार्याध्यक्ष कांचन पवार, प्रकाश झाडवबुके, आयुब शेख मोहीन मुल्ला, किरण शिंदे, मनोज शेरला सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे जाहीर शेख किरण आवताडे आदी उपस्थित होते.

