येस न्युज मराठी नेटवर्क : एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा २५ रुपयांची वाढ केली आहे. चार दिवसांपूर्वीही एलपीजी गॅसच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ झाली होती. देशासह राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठल्याने आधीच सर्वसामान्यांना फटका बसला आहे. २५ रुपयांची वाढ झाल्याने आता १४.२ किलो घरगुती गॅस सिलेंडरसाठी दिल्लीत ८१९ रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन दर आजपासून लागू होत आहेत. याआधी २५ फेब्रुवारी रोजी किंमतीत २५ रुपयांनी वाढ झाली होती. तसेच, ४ फेब्रुवारीला २५ रुपयांची वाढ झाली होती. तर १४ फेब्रुवारीला ५० रुपयांनी दर वाढले होते.