सोलापूर : (समाधान रोकडे) दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने व नवरात्र महोत्सवानिमित्त बुधवार दि. १३ ऑक्टोबर, २०२१ रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले.याचे उद्घाटन निवृत्ती ताकमोगे व विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. या रक्तदान शिबीराचे आयोजक तम्मा कारभारी, संतोष जाधव तसेच सरपंच सविता भोसले, उपसरपंच शिवराज जाधव, ग्रामसेवक नागसेन कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विनोद बनसोडे, निलकंट पाटील, अजमेर शेख, मंगल खरात तसेच सागर बिराजदार, सुरेश बिराजदार, अनिल चव्हाण, सचिन शिंदे, रविंद्र काशिद, ब्रम्हनाथ म्हेत्रे, उमाकांत काकडे, ब्रम्हनाथ पाटील, बाळु बनसोडे, श्रीशैल बिराजदार, भारत कोळेकर, पंडीत बिराजदार, अप्पा केत, शिवराज शिंदे, आरोग्यसेवक उमाकांत केत आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
सोलापूर ब्लड बँक यांच्या सहकार्यातुन व मुळेगाव उपसरपंच शिवराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. ब्रम्हनाथ मंगलकार्यालय मुळेगाव येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले असुन ९४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास गिफ्ट व प्रमाणपत्र देण्यात आले. उपसरपंच शिवराज जाधव यांनी सर्व रक्तदात्यांचे व सोलापूर ब्लड बँक कर्मचाऱ्यांचे आभार मानले.