नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून अनेक उद्योजकांच्या नजरा सोलापूरकडे असताना इथल्या विमान सेवेकडे शासकीय यंत्रणा आणि मंत्री दुर्लक्ष करतात हे वारंवार दिसून येते. सोलापुरात प्रस्तावित असलेले 50 एकरावर होणारे आयटी पार्क.. सोलापूर शहरात एक हजार कोटी रुपये खर्चून होणारे दोन उड्डाणपूल…19 हजार कोटी रुपये खर्चून होणारा सुरत -चेन्नई महामार्ग..सुमारे साडेचार हजार कोटी रुपये खर्चून पंढरपुरात होणारा कॉरिडॉर… सुमारे 20,000 कोटी रुपये खर्चून सोलापूरच्या भोवती टाकला जाणारा रेल्वेचा तिसरा आणि चौथा ट्रॅक आदी मंजूर झालेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांची एकीकडे चर्चा असताना दुसरीकडे सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असताना शिवाय रिकाम्या जाणाऱ्या प्रत्येक सीट साठी 3250 शासनाकडून अनुदान दिले जात असताना देखील स्टार एयर या कंपनीकडून वारंवार सोलापूर करना वेटीस धरले आहे. जुलै महिन्यात पावसाचे कारण देत या कंपनीने विमानसेवा बंद केली. मुख्यमंत्री तसेच पालकमंत्र्यांनी तंबी दिल्यानंतर पुन्हा ही विमान सेवा सुरू झाली. आता पुन्हा








