• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत

Yes News Marathi by Yes News Marathi
November 3, 2026
in मुख्य बातमी
0
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत
0
SHARES
0
VIEWS

आरोग्य व शिक्षण समिती सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांचा पुढाकार; शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण सूचना

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सोलापूरच्या शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक आणि गुणवत्तापूर्ण परिवर्तन घडवून आणण्यासाठी आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती मा. चेतनसिंह केदार-सावंत यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शाळांमध्ये सक्षम शैक्षणिक वातावरण आणि शिक्षण विभागाच्या कामकाजात प्रभावी सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने आयोजित शिक्षण समितीच्या बैठकीत त्यांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

तालुकास्तरावर राबविण्यात येत असलेला अभिनव शाळा तपासणी पॅटर्न संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात लागू करण्याची सूचना त्यांनी केली. शाळांची तपासणी केवळ कागदपत्रांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांचे अध्यापन, शाळांमधील भौतिक सुविधा आणि शैक्षणिक वातावरणाचा सर्वांगीण आढावा घेण्यावर त्यांनी भर दिला. शाळा तपासणी ही केवळ औपचारिकता न राहता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीचे प्रभावी माध्यम ठरावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

शिष्यवृत्ती परीक्षेची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने सध्या चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांपुरती असलेली संधी अधिक व्यापक करून सर्व इयत्तांतील विद्यार्थ्यांना परीक्षेत सहभागी होता यावे, यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रोत्साहन वाढविण्यावर यामुळे भर देता येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा मालकी हक्क जिल्हा परिषदेकडे घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणी समितीसमोर मांडून त्यावर योग्य तोडगा काढण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, जवाहरलाल नेहरू मुलांचे वसतिगृह आणि सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह येथील भौतिक सुविधांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुविधायुक्त आणि दर्जेदार निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे.

या बैठकीस आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, शिक्षण समिती सदस्य चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव, श्रुती भोरगुंडे, सुषमा नारनवर, विजयराज डोंगरे, शिवराज म्हेत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे, शिक्षणाधिकारी योजना सुजित शिंदे, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

Related Posts

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल
मुख्य बातमी

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

November 3, 2026
सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी
मुख्य बातमी

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 2, 2026
महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत
मुख्य बातमी

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

November 2, 2026
महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन
मुख्य बातमी

महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन

November 2, 2026
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणार – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणार – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

November 2, 2026
केतन वोरा मित्र परिवाराच्या वतीने पाच हजार जणांना फराळाचे वाटप
मुख्य बातमी

केतन वोरा मित्र परिवाराच्या वतीने पाच हजार जणांना फराळाचे वाटप

November 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत

November 3, 2026
दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

November 3, 2026
सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026