• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उत्साहात

Yes News Marathi by Yes News Marathi
October 27, 2026
in Blog
0
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उत्साहात
0
SHARES
0
VIEWS

९ लाख ८३ हजारांहून अधिक बालकांना जंतमुक्त करण्याचे उद्दिष्ट; पालकांनी सहकार्य करावे – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे आवाहन


सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात १ ते १९ वयोगटातील बालकांना जंतमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम आज संपूर्ण जिल्ह्यात उत्साहात राबविण्यात आली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ९ लाख ८३ हजार ७०६ बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य संस्थांच्या माध्यमातून १ ते १९ वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. बालकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांच्यातील रक्तक्षय व अशक्तपणा कमी व्हावा आणि त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ योग्य प्रकारे व्हावी, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर, कोंडी येथे भेट देऊन मोहिमेच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा, कोंडी येथे विद्यार्थ्यांना स्वतःच्या हस्ते जंतनाशक गोळ्या देऊन मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना जंतमुक्तीचे महत्त्व समजावून सांगितले.

जंतमुक्तीमुळे बालकांचे आरोग्य आणि भविष्य सुरक्षित
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन म्हणाले, जंतसंसर्गामुळे बालकांमध्ये रक्तक्षय, अशक्तपणा निर्माण होऊ शकतो. तसेच त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासावरही परिणाम होऊ शकतो. जंतनाशक गोळ्यांच्या नियमित सेवनामुळे बालकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. जिल्ह्यातील ९ लाख ८३ हजारांहून अधिक बालकांपर्यंत या मोहिमेचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.

मोहिमेच्या दिवशी ज्या बालकांना जंतनाशक गोळी घेता आली नाही, अशा बालकांना ३ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित मॉप-अप राऊंडमध्ये गोळी देण्यात यावी. यासाठी पालकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.
या कार्यक्रमास सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत आयवळे, आयुष्मान आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे, जिल्हा परिषद शाळा कोंडीचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

इंगळगी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत तरूण ठार

Next Post

तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा

Related Posts

तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा
Blog

तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा

October 27, 2026
इंगळगी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत तरूण ठार
Blog

इंगळगी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत तरूण ठार

October 27, 2026
Blog

नालेसफाईतील कथित घोटाळ्याप्रकरणी सारिका आकुलवार, गिरीश पुकाळे यांची आता विभागीय चौकशी होणार

October 24, 2026
शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!
Blog

शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

October 22, 2026
ए. जी. पाटिल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे “कायदेविषयक जनजागृती”
Blog

ए. जी. पाटिल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे “कायदेविषयक जनजागृती”

October 22, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक
Blog

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

October 21, 2026
Next Post
तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा

तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट

October 27, 2026
तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा

तुळजापुरात दीड हजार भक्तांचा दत्त-दुर्गा महानुष्ठानाचा भक्तिसोहळा

October 27, 2026
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उत्साहात

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उत्साहात

October 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026