उजनी ते सोलापूर या 110 किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीतून सोलापूर शहराला पाणीपुरवठा होतो हे सर्वांना माहीत आहे मात्र सोलापूर ला गुजरात वरून थेट पाईपलाईन मधून इंधनपुरवठा सुरू झाला आहे हे अनेकांना माहीत नसेल.गुजरात मधील बडोदा येथील-कोयली रिफायनरीपासून ते सोलापूर शहराजवळील पाकणी ऑइल डेपोपर्यंत 750किलोमीटर लांबीची आणि 18 इंच व्यासाची पाईपलाईन गेल्यावर्षी टाकण्यात आली.जानेवारी 2025 पासून गुजरात मधून थेट सोलापूरला या पाईपलाईन मधून अखंडपणे इंधन पुरवठा होत आहे.या पाईपलाईन मधून पेट्रोल, डिझेल तसेच विमानाला लागणारे एटीएफ इंधन देखील येत आहे.वर्षाला पाच मिलियन मॅट्रिक टन एवढी क्षमता या पाईपलाईनची असूनइंडियन ऑइल कॉर्पोरेशन द्वारे ही पाईपलाईन टाकण्यात आली आहे.कोयली रिफायनरी -आणंद परिसर-ओलांडून ही पाईपलाईन महाराष्ट्रातील नगर, श्रीगोंदा, पारनेर ,करमाळा ,माढा या मार्गे उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी ऑइल डेपो मध्ये येते.या पेट्रोल पाईपलाईन वाहिनीवर ट्वेंटी फोर बाय सेव्हन मॉनिटरिंग असून स्काडा सिस्टीम द्वारे याला नियंत्रण केले जाते.पाकणीडेपो मध्ये अखंडपणे गुजरात मधून इंधन येत आहे. हे इंधन सोलापूर शहर- जिल्हा, धाराशिव, लातूर, बीड ,सांगली ,कोल्हापूर या भागालाटँकरद्वारे तर कधी रेल्वे द्वारे पाठवले जाते.त्यामुळे सोलापूरला इंधनपुरवठ्याची लाईफ लाईन मानली जात आहे.अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर सुरू झाल्याने सोलापूरला थेटपाईपलाईन मधून गुजरातचे पेट्रोल मिळू लागले आहे हे विशेष…
