• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा…ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार

Yes News Marathi by Yes News Marathi
October 21, 2026
in इतर घडामोडी
0
सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा…ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार
0
SHARES
1
VIEWS

सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षणातील विविध यशस्वी उपक्रमांमुळे राज्यात ‘ज्ञानयात्री’ म्हणून ओळख निर्माण झालेले डॉ. बी. पी. रोंगे सर हे सांगोला तालुक्यातील शिक्षकांशी थेट संवाद साधत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या भेटींना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. साधारण दिड वर्षभरापासून डॉ. बी.पी.रोंगे सरांनी पुणे विभागात असणाऱ्या पाचही जिल्ह्यांतील शाळा- महाविद्यालयांना व पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटी देवून तेथील समस्या जाणून घेतल्या. ज्याप्रमाणे स्वेरीतील विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल होत आहे त्याचप्रमाणे ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे भविष्यही उज्वल झाले पाहिजे. डॉ. रोंगे सरांच्या रूपाने पुणे विभागाला अभ्यासू आमदार मिळणार असल्याची भावना सर्वत्र निर्माण झाली आहे. यावेळी राज्यातील शिक्षकांनी डॉ. रोंगे सरांना विजयी करण्याचा विडा उचलला आहे, हेच वाढत्या प्रतिसादावरून दिसून येते.

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी अर्थात श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे हे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे पहायला मिळत आहे. या निमित्ताने सर्वत्र डॉ. रोंगे सरांचे भव्य स्वागत केले जात आहे. प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटीच्या रूपाने प्रचारात मात्र कमालीची आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे. स्वेरीच्या स्थापनेपासून डॉ. रोंगे सरांची मुद्देसूद आणि व्यवस्थित मांडणी, प्रत्येक समस्येचा सुक्ष्म अभ्यास या धोरणांमुळे डॉ. रोंगे सरांच्या तंत्रशुद्ध अभ्यासाचा आता राज्याला फायदा होणार आहे. एकूणच डॉ. रोंगे सरांकडे शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मंडळीचे लक्ष लागले आहे तसेच त्यांना पाचही जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांतील शिक्षकांचा भक्कम प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरापासून सुरू झालेल्या या काळात प्राचार्य डॉ. रोंगे सरांचे पाचही जिल्ह्यांत झंझावाती दौरे सुरु असून त्यांना सर्वत्र उस्फुर्तपणे प्रतिसाद लाभत आहे. मतदार नोंदणी पासून निवडणूकीच्या सर्व प्रक्रिया याबाबत डॉ. रोंगे सर प्रत्येक शाळेत, प्रत्येक शिक्षकांना, संस्थाचालकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेट देवून चर्चा करत आहेत. या चर्चांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अनेक शिक्षक संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी डॉ. रोंगे सरांना पाठिंबा दर्शविला आहे. एकूणच डॉ.रोंगे सर यांच्या स्वेरी, एसव्हीआयटी आणि स्वाईप या तिन्ही संस्थांना अल्पावधित मिळालेल्या यशामुळे शिक्षकांची अपेक्षा वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील शाळा- महाविद्यालयांना भेटी देऊन डॉ. रोंगे सरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी सांगोला मधील डॉ. बी.पी रोंगे सर यांनी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस सांगोला, शिवाजी पॉलीटेक्निक सांगोला, विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला, विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल सांगोला, डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगोला, सांगोला महाविद्यालय सांगोला, सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल सांगोला, ज्ञानदीप विद्यालय सांगोला, छत्रपती शिवाजी विद्यालय वाटंबरे, श्रीधर कन्या प्रशाला नाझरे, कोळा विद्यामंदिर हायस्कूल कोळा, जुनोनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जुनोनी, महात्मा फुले विद्यालय किडबिसरी, आदर्श विद्यामंदिर जुजारपूर, राजुरी हायस्कूल राजुरी, गुरुकुल विद्यापीठ राजुरी, सोनंद हायस्कूल सोनंद, लक्ष्मीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनंद, वत्सलादेवी विद्यालय व जुनिअर कॉलेज जवळा, भोपसेवाडी विद्यालय भोपसेवाडी, जवाहरलाल विद्यालय घेरडी, कडलास हायस्कूल कडलास, बहुउद्देशीय कन्या प्रशाला कडलास, सरदार शामराव लिगाडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज अकोला, शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवणे, विद्यामंदिर वाकी – शिवणे, हलदहिवडी विद्यालय हलदहिवडी, शिरभावी हायस्कूल शिरभावी,चिंचोली माध्यमिक विद्यालय चिंचोली,श्री शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज महूद, पांडुरंग विद्यालय कटफळ आदी शाळांना भेटी दिल्या तर स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे यांनी अभिजीत कदम विद्यालय मेथवडे, सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडे, मांजरी हायस्कूल मांजरी, उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सांगोला, नाझरा विद्यामंदिर नाझरा, उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सांगोला, सिंहगड कमलापूर, विद्यामंदिर हायस्कूल व अध्यापक विद्यालय एखतपूर, माध्यमिक आश्रम शाळा डिकसळ, छत्रपती शिवाजी विद्यालय पारे, कै. काकासाहेब साळुंखे पाटील विद्यालय हांगीरगे, नराळे विद्यालय, नराळे मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज घेरडी, गुरुदत्त विद्यालय वाकी -घेरडी, श्री.अशोकराव देसाई कृषी विद्यालय आलेगाव इतर शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. या भेटी दरम्यान बोलताना ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सर म्हणाले की ‘आज शिक्षकांसमोर अनेक प्रश्न, अडचणी व समस्या आहेत. त्या सर्व शासन पातळीवर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. टीईटी, जुनी पेन्शन योजना अशा अनेक समस्या आहेत, त्यांचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. खरे पाहता हे प्रश्न फार पूर्वी सुटायला हवे होते परंतु उदासीनतेमुळे ते सुटलेले नाहीत. यासाठी जर आपण सेवा करण्याची संधी दिली तर जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न करून अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी कोठेही कमी पडणार नाही.’ अशी ग्वाही त्यांनी दिली. या कारणांमुळे सर्वत्र डॉ. रोंगे सरांना प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होते. आमदार होण्यापूर्वीच त्यांनी कांही प्रश्न सोडविले आहेत त्यामुळे डॉ. रोंगे सरांकडे पुणे विभागातील शिक्षक आशेने पाहत आहेत, हे मात्र नक्की जाणवते.

Previous Post

कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम

Next Post

रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा

Related Posts

कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम
इतर घडामोडी

कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम

October 21, 2026
पलूसमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांचा मान्यवरांशी संवाद
इतर घडामोडी

पलूसमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांचा मान्यवरांशी संवाद

October 21, 2026
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात
इतर घडामोडी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात

October 20, 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच
इतर घडामोडी

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

October 19, 2026
येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड
इतर घडामोडी

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

October 19, 2026
खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
Next Post
रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा

रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

October 21, 2026
दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज

October 21, 2026
रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा

रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा

October 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026