• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यात नवे नियम जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
May 31, 2021
in मुख्य बातमी
0
राज्यात नवे नियम जाहीर
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क ; राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तर धोका टळलेला नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. या कालावधीत काही बाबींमध्ये सूट देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता यासाठी वेगळी प्रशासकीय यंत्रणा असणार आहे. या भागातील नियमावली त्या त्या भागातील प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार कार्यरत असणार आहे. तर २९ मे पर्यंतचा करोनाची आकडेवारी ग्राह्य धरली जाणार आहे. पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता पाहून पुढच्या १५ जूनपर्यंतची नियमावली आखली जाईल.

पॉझिटीव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे आणि पालिकांसाठी खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील

अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी
सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने, मॉल्स किंवा शॉपिंग सेंटर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील. तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.
अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई-कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.
दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.
करोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जास्त उपस्थिती हवी असल्यास संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.
कृषीविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते
पॉझिटीव्हीटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.

या जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.
दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही.
या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.
उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे ब्रेक द चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.
मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम राहातील असे जाहीर केले. तसेच, जिल्ह्यांमधील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन काही जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करावे लागतील, तर काही जिल्ह्यांमध्ये कदाचित निर्बंध शिथील केले जातील असं देखील सांगितलं.

Previous Post

घरफोडीचे सात गुन्हे उघड

Next Post

देशात गेल्या २४ तासात आढळले १ लाख २७ हजार नवे रुग्ण

Related Posts

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

July 2, 2026
TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
Next Post
देशात गेल्या २४ तासात आढळले १ लाख २७ हजार नवे रुग्ण

देशात गेल्या २४ तासात आढळले १ लाख २७ हजार नवे रुग्ण

ताज्या बातम्या

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
आषाढी यात्रा सोहळा; पालखी सोहळा, दिंडीधारकांनी प्लॉटसची मागणी नोंदवावी

आषाढी यात्रा सोहळा; पालखी सोहळा, दिंडीधारकांनी प्लॉटसची मागणी नोंदवावी

July 5, 2026
जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026