सराईत गुन्हेगारास अटक करून २ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
सोलापूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात वारंवार घरफोड्या होत असल्याने गुन्ह्यातील आरोपी चा शोध घेऊन नंदकुमार कोक्कुल याला सापळा रचून विनायक नगर येथील मोकळ्या मैदानात पकडण्यात आले. कोक्कुल याच्याजवळील ६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २१ तोळे चांदीचे दागिने, हिरो कंपनीची मोटर सायकल, रंगीत टीव्ही , काळ्या रंगाचे गिटार, सॅमसंग कंपनीचा मोबाईल, लोखंडी पकड, लोखंडी कट्टर आणि स्क्रू ड्रायव्हर असा २,२०,८५० रुपयांचा माल हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर यांच्या पथकाने सापळा रचून शिताफीने गुन्हेगारास अटक केली आहे.
