सोलापूर (समाधान रोकडे) : केंद्रातील सरकारने नुकतीच जाहीर केलेली खतांची दरवाढ तसेच पेट्रोल, डिझेल,गॅस यांची केलेली भाववाढ ही कोरोनाच्या काळात शेतकरी राजा व सर्वसामान्य लोकांना न परवडणारी असून ही भाववाड कमी करण्यात यावी यासाठी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी तहसीलदार जयंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.यावेळी येथे उपस्थित राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद,युवक अध्यक्ष बालाजी पवार,उपसभापती जितेंद्र शिलवंत,मार्डी चे सरपंच अविनाश मार्तंडे, मनोज साठे,हरिभाऊ घाडघे, प्रभाकर गायकवाड तसेच राष्ट्रवादी चे कार्यकर्ते उपस्थित होते.