• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

Yes News Marathi by Yes News Marathi
June 26, 2026
in इतर घडामोडी
0
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
0
SHARES
1
VIEWS

बडे-छोटे तलवार पंजांची भेट, ५१ पेटत्या मशालींसह दुर्वेश सवारी, पीर मंगलबेढा सवारीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

सोलापूर : करबला येथील युद्धात शहीद झालेल्या हजरत इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ साजरा करण्यात आलेल्या मोहरम उत्सवाची शुक्रवारी भक्तिपूर्ण वातावरणात भव्य मिरवणुकांनी सांगता झाली. मोहरमच्या पाचव्या दिवसापासून सुरू झालेल्या पंजा व सवारींच्या मिरवणुकांचा समारोप दहाव्या दिवशी सामूहिक मिरवणुकीने झाला. शहरातील विविध भागांतून निघालेल्या मानाच्या पंजा व सवारी आसार मैदान येथे एकत्र आल्यावर पारंपरिक भेटीचा सोहळा पार पडला. ‘या हुसेन… या हुसेन’च्या जयघोषात हजारो मुस्लिम बांधवांसह विविध समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शहरातील प्रमुख मार्गांवर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता भारतीय चौक येथे मानाच्या बडे तलवार पंजा आणि छोटे तलवार पंजा यांच्या भेटीचा सोहळा हजारो हिंदू-मुस्लिम भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यापूर्वी या दोन्ही पंजांची पहिली भेट जिंदाशाह मदार चौक येथे झाली होती, तर दुसरी भेट भारतीय चौकात झाली. दोन्ही पंजांची भेट होताच वर बांधून ठेवलेल्या फुलांच्या पाकळ्या आणि रंगाचा डबा दोरीच्या साहाय्याने उघडण्यात आला. त्यानंतर फुलांची आणि रंगांची उधळण करण्यात आली. हा अविस्मरणीय क्षण उपस्थितांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यांत कैद केला. हा सोहळा पाहण्यासाठी महिला, युवक आणि लहान मुलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

पीर मंगलबेढा सवारीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पीर मंगलबेढा अहले हरम सवारीची मिरवणूक सकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली. मंगलबेढा तालीम येथून सकाळी आठ वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला. मार्गावरील विविध ठिकाणी भाविकांनी पुष्पवृष्टी करून सवारीचे स्वागत केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही या मिरवणुकीत हिंदू बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती, त्यामुळे सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन घडले.

मिरवणुकीत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. धनंजय माने,नगरसेवक अमोल शिंदे,बिज्जू प्रधाने,संकेत पिसे, शैलेश पिसे, सतीश प्रधाने, अमर ढंगेकर, सवारीचे मानकरी पृथ्वीराज दीक्षित, सदाशिव येलूरे, सुनील शेळके, इब्राहिम शेख, राजू हुंडेकरी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी सवारीचे प्रमुख मानकरी तथा ज्येष्ठ पत्रकार स्व. एजाज हुसेन मुजावर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

५१ पेटत्या मशालींसह धावली दुर्वेश सवारी

शनिवार पेठ येथील मानाच्या दुर्वेश सवारीच्या वतीने पहाटे तसेच सायंकाळी पारंपरिक पद्धतीने ५१ पेटत्या मशालींसह धावती मशाल मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही मिरवणूक मोहरम उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरली. मिरवणूक मार्गाच्या दोन्ही बाजूंना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

शनिवार पेठ येथून सायंकाळी सुमारे साडे सात वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या अग्रभागी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेला घोडेस्वार सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्यानंतर ५१ पेटत्या मशालींसह धावणाऱ्या युवकांनी पारंपरिक धार्मिक वातावरण अधिकच भारावून टाकले. मशालींच्या प्रकाशात आणि ‘या हुसेन’च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

खिचड्याचा लंगर व शरबत वाटप

मोहरमनिमित्त शहरातील विविध भागांत सामाजिक सलोखा आणि सेवाभावाचे दर्शन घडले. मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी भाविकांसाठी शरबत, दूध, कोल्ड्रिंक तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. बारा इमाम चौक, पेंटर चौक तसेच विजापूर वेस परिसरात ‘लंगर-ए-आम’ अंतर्गत खिचड्याचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी या लंगराचा लाभ घेत मोहरम उत्सवात सहभागी होत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. संपूर्ण मिरवणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Previous Post

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

Related Posts

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…
इतर घडामोडी

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026