• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे कामगारांना न्याय देणार – धनंजय मुंडे यांची घोषणा

Yes News Marathi by Yes News Marathi
May 22, 2022
in इतर घडामोडी
0
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे कामगारांना न्याय देणार – धनंजय मुंडे यांची घोषणा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : निसर्गाची पर्वा न करता रात्रंदिवस ऊसतोड मजूर हा ऊसतोडणीसाठी काबाडकष्ट करतो. अंधारात पहाटे उठून ऊस तोडून साखर कारखान्यांना पोहोच करण्याचे काम करतो. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

धोत्री ता. दक्षिण सोलापूर येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यातर्फे आयोजित शेतकरी स्नेह मेळावा आणि गळित हंगाम सांगता समारंभ कार्यक्रमात मुंडे बोलत होते. यावेळी आमदार संजय शिंदे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, लोकनेते शुगरचे बाळराजे पाटील, संतोष पवार, कारखान्याचे कार्यकारी संचालक विशाल शिंदे, तुळजा भवानी शुगरचे सुनील चव्हाण आदींसह शेतकरी, ऊसतोड कामगार, मुकादम उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, ऊसतोड कामगारांच्या खूप व्यथा आहेत. या व्यथा सोडविण्यासाठी कामगार विभागाकडे जाणारे हे महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे घेतले आहे. महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक नोंदणीकृत कामगारांचा विमा उतरविला जाणार आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात वसतीगृहांची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी ऊसतोड कामगारांनी महामंडळाकडे त्वरित नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. प्रती टन 10 रूपये कामगारांनी महामंडळाकडे जमा केल्यास शासन 10 रूपये देणार आहे. यातून कामगारांचा विकास करण्याचे शासनाचे धोरण आहे.

महामंडळामार्फत साखर कारखान्यांच्या सहकार्याने शंभर टक्के ऊस तोडणी कामगार, मुकादम, वाहतूकदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यांना ओळखपत्र, बांधकाम कामगारांच्या धर्तीवर कल्याणकारी योजना व सामाजिक सुरक्षा लागू करण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

गोकुळ शुगरने मराठवाड्यात असलेला अतिरिक्त ऊस आणून विक्रमी सात लाख 71 हजार मेट्रीक टन गाळप केले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना संकटात मदत करायला हवी. महाविकास आघाडी शासनाने शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी दिली आहे. कोरोना संकटात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ दिल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी केले. त्यांनी सांगितले की, विक्रमी गाळपासोबत वीज निर्मिती कारखान्याने केली आहे. शेतकऱ्यांचा विकास हेच ध्येय ठेवून काम करीत आहे. कारखाना बंद झाल्यानंतर 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिलाचे 140 कोटी जमा केले. उर्वरित तीन कोटी 60 लाख लवकरच जमा करीत आहे.

यावेळी माजी मंत्री चव्हाण, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक कपिल शिंदे, व्यंकट मोरे यांनीही विचार व्यक्त केले.

यावेळी मुंडे यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. 2022-23 या वर्षासाठी ऊसतोडणीसाठी मुकादम, वाहनमालक यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार विशाल शिंदे यांनी मानले.

Previous Post

समर्पित आयोग करत असलेल्या सर्वेक्षणावर सकल मराठा समाजाकडून हरकत

Next Post

कार्पोरेट कंपनीस नोकरीस असलेले दाम्पत्यांचा अवघ्या दीड महिन्यात घटस्फोट

Related Posts

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?
इतर घडामोडी

साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?

August 21, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
Next Post
कार्पोरेट कंपनीस नोकरीस असलेले दाम्पत्यांचा अवघ्या दीड महिन्यात घटस्फोट

कार्पोरेट कंपनीस नोकरीस असलेले दाम्पत्यांचा अवघ्या दीड महिन्यात घटस्फोट

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026