निर्देशाचे पालन न केल्यास होऊ शकते दंडात्मक कारवाई.
येस न्यूज नेटवर्क : राज्यातील सर्व नोंदणीकृत डॉक्टरांसाठी ‘Know Your Doctor’ (KYD) QR कोड प्रणाली विकसित करण्यात आली असून प्रत्येक डॉक्टरांनी आपल्या दवाखान्यात दर्शनी भागात हा QR कोड लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. बोगस किंवा अपात्र वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालणे आणि रुग्णांना डॉक्टरांची अधिकृत माहिती सहज उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (MMC) आपल्या नोंदणीकृत डॉक्टरांना हे QR कोड दिले आहेत. कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित डॉक्टरांचे नाव ,अर्हता (डिग्री), नोंदणी क्रमांक, याबाबतची माहिती मिलेल. यामुळे अनधिकृत किंवा बोगस डिग्री लावून प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर्सना ओळखणे सहज शक्य होणार असून वैद्यकीय क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
राज्यातील सर्व डॉक्टरांनी ऑक्टोबर 2026 अखेर पर्यंत आपल्या हॉस्पिटल अथवा क्लिनिक मध्ये QR कोड लावणे बंधनकारक असून असे न केल्यास त्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.











