• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

Yes News Marathi by Yes News Marathi
September 9, 2026
in Blog
0
भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने विविध विभागांचा आढावा घेण्यात येत असून, मालमत्ता कर विभागाच्या बैठकीनंतर महापालिकेतील भूमी-मालमत्ता विभागाच्या अखत्यारित असलेल्या मेजर व मिनी गाळ्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, मुख्यलेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, उपायुक्त सोनाली यादव, सहायक आयुक्त विनोद कुलकर्णी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये महापालिकेच्या मालकीच्या विविध मेजर व मिनी गाळ्यांची सद्यस्थिती, गाळेधारकांकडून येणे असलेली थकबाकी, झालेली वसुली, प्रलंबित वसुली तसेच थकबाकीदार गाळेधारकांवर करण्यात आलेली कारवाई याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी शहरातील महापालिकेच्या अखत्यारित एकूण किती मेजर व मिनी गाळे आहेत, त्यापैकी किती गाळेधारकांकडून नियमित भाडे व इतर देयके जमा केली जात आहेत, किती गाळ्यांची थकबाकी प्रलंबित आहे, तसेच थकबाकीदार गाळेधारकांना आतापर्यंत किती नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, याची माहिती महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.

तसेच थकबाकी असलेल्या किती गाळ्यांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे, किती गाळ्यांकडून वसुली झाली आहे आणि अद्याप किती गाळ्यांची थकबाकी बाकी आहे, याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेअंतर्गत गाळ्यांकडून झालेल्या वसुलीचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

महापौर विनायक कोंड्याल यांनी महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. ज्या गाळेधारकांना थकबाकीबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडून लवकरात लवकर थकबाकीची वसुली करण्यात यावी. तसेच उर्वरित सर्व थकबाकीदार गाळेधारकांकडूनही नियमानुसार वसुलीची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महापालिकेच्या मालमत्तेचा योग्य वापर होण्याबरोबरच महापालिकेचे उत्पन्न वाढणे आवश्यक असून, थकबाकीदारांकडून वसुलीसाठी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यकतेनुसार नियमानुसार कारवाई करावी, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या गाळे भाडे व थकबाकी वसुलीमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये आणि उपलब्ध असलेली सर्व देय रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होण्यासाठी विभागाने प्रभावी नियोजन करावे, अशा सूचनाही महापौर विनायक कोंड्याल यांनी यावेळी दिल्या.

Previous Post

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

Next Post

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

Related Posts

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल
Blog

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

September 9, 2026
पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!
Blog

पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

September 9, 2026
रमाई आणि अहिल्यादेवी आवास योजनेबाबत खा. प्रणितीताई विरुद्ध खा. ज्योतीताई…!
Blog

रमाई आणि अहिल्यादेवी आवास योजनेबाबत खा. प्रणितीताई विरुद्ध खा. ज्योतीताई…!

September 9, 2026
डॉक्टरांचे निवृत्ती वय 70 वर्षे; सरकारचा मोठा निर्णय.
Blog

डॉक्टरांचे निवृत्ती वय 70 वर्षे; सरकारचा मोठा निर्णय.

September 9, 2026
गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!
Blog

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

September 8, 2026
खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न
Blog

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
Next Post
मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

September 9, 2026
भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

September 9, 2026
सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026