नवी दिल्ली: मॉडर्न स्कूल गाऊंड, नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या वहिल्या अंध महिला T-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघावर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
सामन्याचा संक्षिप्त तपशील:प्रथम फलंदाजी: नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघ 13.3 षटकांत सर्वबाद केवळ 41 धावा करू शकला.
भारताची उत्कृष्ट गोलंदाजी व क्षेत्ररक्षण:
भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना सोलापूरच्या कु. गंगा कदम हिने 1 षटकात केवळ 1 धाव देत 1 बळी घेतला.
सर्वाधिक उल्लेखनीय म्हणजे, गंगा कदम हिच्या प्रभावी क्षेत्ररक्षणामुळे श्रीलंकेचे 5 खेळाडू धावबाद झाले.
भारताची विजयी फलंदाजी:
भारताने विजयाचे लक्ष्य अवघ्या 3 षटकांत बिनबाद 43 धावा करून पूर्ण केले.
कर्णधार दीपिका हिने 14 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या.
अनिता ठाकूर हिने 6 चेंडूंत 3 चौकारांसह नाबाद 15 धावा केल्या.

सामनावीर पुरस्कार
उत्कृष्ट गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे गंगा कदम हिला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अभिनंदन
गंगा कदम हिच्या या महत्त्वपूर्ण यशाबद्दल उद्योजक राजेश दमाणी, भैरुरतन दमाणी अंध शाळेचे सचिव संतोष भंडारी, व प्रशिक्षक राजू शेळके यांनी तिचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

