• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

Yes News Marathi by Yes News Marathi
July 4, 2026
in इतर घडामोडी
0
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल
0
SHARES
24
VIEWS

सोलापूर- वैयक्तिक शौचालय बांधकाम अनुदान घोटाळा प्रकरणी तत्कालीन ग्राम विस्तार अधिकारी आर. एम. कमळे रा. सोलापूर, यांचेसहित अधिकारी व्ही. आर. पाटील,एस. जी. पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी के. एम. शेख या चार जणांची एकूण रु.२,६७,५०० इतक्या रक्कमेचा कथित अपहार केल्याप्रकरणी सोलापूर येथील विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

याची हकीकत अशी की, सन १९९६-९७ साली राज्य शासनाची ग्राम पंचायत स्तरावर वैयक्तिक शौचालय बांधकाम योजना सुरू होती. त्यासाठी प्रत्येकी एका शौचाल्यास रु. ४,०००/- खर्चापैकी रु. २,५००/- इतके अनुदान होते. मौजे कुरुल येथील रहिवासी आर. एन. गुरव, यांनी दि. २८/१२/१९९९ रोजी मा. लोकायुक्त, मुंबई यांच्याकडे तक्रार केली की, शौचालय बांधकाम अनुदानात गैरप्रकार होत असून, त्यांचे नावे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, यांनी रु. २,५००/- इतकी अनुदानाची रक्कम अनाधिकाराने मिळविलेबाबत सदर कार्यालयाने त्या तक्रारीची दखल घेऊन, सदर प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशी करून कारवाई करण्यासाठी पाठविण्यात आले. त्याप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील सहा. पोलीस आयुक्त यांनी चौकशी केली, चौकशी अंती त्यांनी प्रकरणात संबंधित व्यक्तींविरुद्ध दि.१५/०२/२००१ रोजी गुन्हा दाखल केला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुढील तपास करून दि.१७/०८/२००७ रोजी एकूण आठ आरोपी विरुध्द आरोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखालील सोलापूर येथील विशेष न्यायालयात झाली. सदरचा खटला चालू असताना एकूण चार आरोपी मयत झाले. उर्वरित वरील चार आरोपी विरुध्द खटला चालू राहिला. त्यामध्ये सरकार पक्षाने एकूण ३१ साक्षीदार तपासले.

अंतिम सुनावणीवेळी सरकार पक्षाने असा युक्तिवाद मांडला की, शौचालय बांधकाम अनुदानामध्ये अपहार केल्याबद्दल आरोपीविरुध्द भक्कम पुरावा आलेला आहे. त्यामुळे त्यांना दोषी धरून शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील ॲड. डी. एम. पवार,ॲड. पी. एस. जन्नू यांनी केला, तर आरोपी तर्फे युक्तिवाद करताना, ॲड. शशि कुलकर्णी यांनी सांगितले की, आरोपी ग्रामविस्तार अधिकारी आर. एम. कमळे यांनी सदर प्रकरणात फक्त त्यांचेकडे सोपवलेल्या तक्रारीची चौकशी अधिकारी म्हणून काम केले आहे व त्याप्रमाणे त्यांनी चौकशी करून योग्य अहवाल प्रामाणिकपणे दिलेला आहे, त्यामुळे त्यांचा या प्रकरणात, तथाकथित अपहाराचा, कोणताही संबंध येत नाही, कोर्टासमोर कोणताही योग्य व आवश्यक पुरावा आला नाही, आरोपी विरुध्दचा आरोप कोणत्याही प्रकारे सिध्द होत नाही. असा युक्तिवाद मांडला. तसेच इतर आरोपी तर्फे सुध्दा वरीलप्रमाणेच युक्तिवाद मांडण्यात आला.

त्यावर न्यायालयाने प्रकरणात कोर्टासमोर योग्य व आवश्यक पुरावा आला नाही, आरोपी विरुध्दचा आरोप सिध्द होत नाही, असे मत नोंदवून न्यायालयाने चारही आरोपींना निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.

सदर कामी आरोपी ग्राम विस्तार अधिकारी आर. एम. कमळे यांचेतर्फे ॲड. शशि कुलकर्णी, ॲड. स्वप्निल सरवदे, ॲड. प्रणव उपाध्ये यांनी काम पाहिले, तसेच इतर आरोपी तर्फे ॲड. बाबासाहेब जाधव व ॲड. डी. बी. कपाले यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे ॲड. डी. एम. पवार, ॲड. पी. एस. जन्नू यांनी काम पाहिले. ॲड

Previous Post

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

Next Post

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026